एक्स्प्लोर
Advertisement
गुगलसम्राट सुंदर पिचाईंचं वेतन जगात अव्वल
मुंबई : जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या सीईओचा पगार किती असेल, याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? गुगलचे सम्राट सुंदर पिचाई यांचा पगार तुमच्या कल्पनेच्याही पल्याड असून शकतो. पिचाई यांचा वार्षिक पगार तब्बल 200 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1285,51,00,000 (12.85 अब्ज) रुपये आहे. म्हणजेच त्यांना महिन्याला तब्बल एक अब्ज रुपये पगार मिळतो.
वेतन म्हणून इतकी मोठी रक्कम असलेले सुंदर पिचाई हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत. सुंदर पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट 2015 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली होती. 2016 मध्ये त्यांना 198.7 मिलियन डॉलर म्हणजे
12.77 अब्ज रुपयांचे शेअर्स मिळाले होते.
2015 च्या तुलनेत पिचाई यांचे शेअर्स दुपटीने वाढले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, गुगलच्या अनेक उत्पादनांचं यशस्वी लाँचिंग झाल्यामुळेच सुंदर पिचाई यांची सीईओ पदावर बढती झाली आणि वेतनवृद्धी समितीनं त्यांना जबरदस्त पगारवाढ दिली आहे.
कोण आहेत सुंदर पिचाई?
2015 मध्ये ऑगस्ट महिन्यात सुंदर पिचाई यांची गुगलच्या सीईओपदी वर्णी लागली. पिचाई हे टेक वर्ल्डमधील मोठं नावं आहे. सुंदर पिचाई मागील 13-14 वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहे. पिचाई हे गुगलच्या अँड्रॉईड, क्रोम आणि अॅप्स डिव्हिजनचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट होते. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलपमेंटमध्ये सुंदर पिचाई यांची महत्त्वाची भूमिका होती.
पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर होते, तर सुंदर पिचाई यांना लहानपणापासूनच गॅझेट्सची आवड होती. इतकंच नाही तर सुंदर पिचाई हे त्यांच्या शाळेच्या क्रिकेट संघाचे कर्णधारही होते.
जन्म –
– सुंदर पिचाई यांचं जन्म चेन्नईमध्ये 1972 मध्ये झाला, सध्या ते 45 वर्षांचे आहेत.
– त्यांचं खरं नाव पिचाई सुंदराजन आहे. पण त्यांना सुंदर पिचाई नावानेच ओळखलं जातं
– सुंदर पिचाई यांनी 2004 मध्ये गुगल जॉईन केलं होतं. त्यावेळी ते प्रॉडक्ट आणि इनोव्हेशन ऑफिसर होते.
शिक्षण-
– पिचाई यांना पेन्सिलव्हानिया यूनिव्हर्सिटीमध्ये सायबेल स्कॉलर नावाने ओळखलं जात होतं.
– पिचाई यांनी त्यांची इंजिनीअरिंगची पदवी आयआयटी खडगपूरमधून घेतली आहे. ते बॅचमधील सिल्वर मेडलिस्ट होते.
– अमेरिकेतील स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये सुंदर यांनी एमएसचं शिक्षण पूर्ण केलं तर वॉर्टन यूनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं.
संबंधित बातम्या :
गुगल बॉस, मला नोकरी करायची आहे, पिचाईंना चिमुरडीचं पत्र
विराटचा फॅन, दीपिका फेव्हरेट, सुंदर पिचाईंनी उलगडल्या आठवणी
मला क्रिकेटर बनायचं होतं : सुंदर पिचाई
सुंदर पिचाई आमच्या शाळेचे, गुगलसम्राटाचं श्रेय लाटण्यासाठी ऑनलाईन कुरघोडी
नरेंद्र मोदींची लवकरच भेट व्हावी: सुंदर पिचाई
दोन खोल्या, टीव्ही नसलेलं घर ते गुगलचा सम्राट
मोठी पदं सांभाळून जगात दबदबा निर्माण करणारे भारतीय
भारतात जन्मलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement