हिंसेसंबंधी पोस्ट, अपशब्द आणि अनधिकृत अकाऊंट्सला रोखण्यात फेसबुक अपयशी! रिपोर्टमधून माहिती
फेसबुकचा वापर करून भारतामध्ये अनेक लोक खोट्या बातम्या आणि हिंसेसंबधीत पोस्ट पसरवत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफोर्मचा वापर अनेक लोक करत असतात. काही लोक फेसबुकवर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत विविध पोस्ट शेअर करतात. स्वत:ची मते मांडण्यासाठी देखील लोक फेसबुक अॅपचा वापर करत असतात. अनेक वेळा फेसबुकपोस्टमध्ये अपशब्द वापरले जातात. तर फेसबुकवरील काही पोस्ट या हिंसेसंबंधी देखील असतात. या पोस्टचा परिणाम समाजातील लोकांवर होत असतो. यासर्व गोष्टींवर रिसर्च करून नुकताच एक रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये हिंसेसंबंधी पोस्ट, अपशब्द आणि अनधिकृत अकाउंट्सला रोखण्यात फेसबुक अपयशी ठरत आहे अशी माहिती समोर आली आहे.
नुकत्याच तयार करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये असे मांडण्यात आले आहे की, फेसबुकचा वापर करून भारतामध्ये अनेक लोक खोट्या बातम्या आणि हिंसेसंबधीत पोस्ट पसरवत आहेत. या खोट्या बातम्यांचा परिणाम भारतामधील अनेक लोकांवर होतो. हे थांबवण्यासाठी कंपनीकडे असणाऱ्या स्टाफची संख्या कमी पडत आहे, असे रिपोर्टमध्ये लिहिले आहे.
रिपोर्टनुसार, फेसबुकवर अनेक अनधिकृत ग्रुप आणि पेज सुरू आहेत, जे हिंसेसंबंधीत पोस्ट पसरवून लोकांना भडकवण्याचे काम करत आहे.
Facebook Messenger : फेसबुक मेसेंजरची 'ही' नवी पद्धत ग्रुप व्हिडीओ कॉल अधिक मजेशीर बनवते
भारतामध्ये फेसबुकवरून हिंसेसंबधी पोस्ट परसरवण्यावर तसेच खोट्या बातम्या आणि अकाउंट तयार करण्याऱ्यांवर रोख लावण्यासाठी फेसबुककडे संसाधने कमी आहेत. जुलै 2020 ते डिसेंबर 2019 पर्यंत हिंसा पसरवणाऱ्या पोस्ट, अपशब्द आणि अनधिकृत अकाउंट यांचे फेसबुकवरील प्रमाण वाढले आहे. फेसबुक यूझर्सबद्दल माहिती मिळवण्यासाठी, फेसबुक कंपनीने फेब्रुवारी 2019 मध्ये उत्तर भारतातील एका 21 वर्षीय महिलेचे काल्पनिक अकाउंट तयार केले होते, असेही या रिपोर्टमध्ये लिहिले आहे.
रिपोर्टनुसार, भारतामध्ये 22 भाषा आहेत. पण फेसबुकचे अल्गोरिदम हे केवळ 5 भाषांवर नजर ठेवू शकते. त्यामुळे फेसबुकवर असलेल्या हिंसेसंबंधीत पोस्ट आणि खोटे अकाउंट ते थांबवू शकत नाहित. राजकिय पक्षांचे अनेक अनधिकृत असलेले अकाउंट तसेच मतदारांची दिशाभूल करणारे अकाउंटवर ते कोणतेही कारवाई करू शकत नाहीत. 2020 मध्ये 40 पेक्षा जास्त नागरी हक्क गटांनी असे सांगितले होतो की, फेसबुक त्यांच्या अॅपवर येणाऱ्या धोकादाक कंन्टेंटला रोखण्यात अपयशी ठरत आहे.
संबंधित बातम्या :