Facebook Messenger : फेसबुक मेसेंजरची 'ही' नवी पद्धत ग्रुप व्हिडीओ कॉल अधिक मजेशीर बनवते
acebook : फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) सारख्या प्लॅटफॉर्मने ग्रुप व्हिडीओ कॉलसारख्या सुविधा वापरकर्त्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
Facebook : फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) सारख्या प्लॅटफॉर्मने ग्रुप व्हिडीओ कॉलसारख्या सुविधा वापरकर्त्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सुविधेमुळेच वापरकर्त्यांना कोविड-19 दरम्यान एकमेकांना अप्रत्यक्षरित्या बांधून ठेवण्यास मदत केली होती. मागील दोन वर्षांत ग्रुप व्हिडीओ कॉल ही दैनंदिन बाब झालेली आहे. त्याच्या अतिवापराने वापरकर्तेदेखील कंटाळले आहेत. त्यामुळेच फेसबूक आता वापरकर्त्यांसाठी नवीन सुविधा घेऊन आले आहे. फेसबुक मेसेंजर ग्रुप इफेक्ट्स (Facebook Messenger Group Effects) असं या नव्या सुविधेचे नाव आहे.
काय आहे फेसबुक मेसेंजर ग्रुप इफेक्ट्स ?
ग्रुप इफेक्ट्स हा एक नवीन AR अनुभव आहे. त्याच्या मदतीने एकाचवेळी व्हिडीओ कॉलची वेळ सगळ्या वापरकर्त्यांना वाढवता येते. मित्र आणि कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. या फेसबुक मेसेंजर ग्रुप इफेक्ट्सचा वापर करुन मित्रांसोबत मस्ती व खेळ खेळता येतो. त्यामुळे तुमचा व्हिडीओ कॉल अधिक रंगतदार होतो.
Facebook नाव बदलण्याच्या तयारीत! काय आहे नेमकं कारण?
फेसबुक मेसेंजर ग्रुप इफेक्ट्सच्या मदतीने वापरकर्ते काय करू शकतात?
मेसेंजरचे वापरकर्ते त्यांच्या मित्रांसोबत मल्टीप्लेअर इंटरेक्शन खेळतात. त्यामुळे व्हिडीओ कॉल अधिक आकर्षित व्हायला मदत होते.
Facebook Fined : ब्रिटन सरकारचा फेसबुकला दणका! माहिती अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 50 मिलियन युरोचा दंड
फेसबुक मेसेंजर ग्रुप इफेक्टचा उपयोग कसा करू शकता ?
एक व्हिडीओ कॉल करा किंवा तुमच्या मेसेंजर अॅपमध्ये एक रुम बनवा. इफेक्ट्स ट्रे (Effects Tray) सुरू करण्यासाठी स्माईली फेस (Smiley face) वर टॅप करा आणि ग्रुप इफेक्ट्सचा पर्याय निवडा.
फेसबुक या महिन्याच्या शेवटी नवीन स्पार्क एआर मल्टीपीअर एपीआयपर्यंत पोहोचण्याच्या विचारात आहे. त्यामुळे अनेकांना ग्रुप इफेक्ट्स निर्माण करता येईल.
फेसबुक सध्या सोशल मीडियापुरतं मर्यादीत न राहाता त्यापुढे जाण्याच्या तयारीत आहे. रविवारी 18 ऑक्टोबर रोजी कंपनीनं युरोपमध्ये 10 हजार जणांनाना नोकरी देण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं. जेणेकरुन कंपनीला मेटावर्स तयार करण्यात मदत मिळेल. कंपनी मेटावर्सलाही भविष्य मानत आहे. महिनाभरापूर्वीच कंपनीनं AR (augmented reality) आणि VR (virtual reality) चीफ आंद्रे बोसवर्थ यांना चीफ टेक्नोलॉजी आधिकारी म्हणून बढती देणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकनं VR आणि AR मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जवळपास तीन अरब यूजर्सला जोडण्याची योजना आहे.