Facebook Stock Falls : सर्व्हर डाऊनचा फेसबुकला फटका, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान
Facebook Stock Falls : काल फेसबुकचे सर्व्हर सहा तासांसाठी स्लोडाऊन झाल्याने कंपनीचे शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी गडगडले आहेत. त्यामुळे फेसबुकला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसलाय.
Facebook Stock Falls : फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्रामचे (Instagram) जगभरातील सर्व्हर तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका या तीनही सोशल मीडिया कंपन्यांना चांगलाच बसलाय. फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. 2019 सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता. कालच्या या घटनेनंतर फेसबुकचं मोठं नुकसान झालं असून त्याचे शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले आहेत.
फेसबुकच्या गडगडलेल्या शेअर्समुळे कंपनीला अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या दरम्यान, स्लोडाऊनसाठी नेमकं काय कारण आहे याचा शोध कंपनीच्या वतीनं घेण्यात येत होता. या वर्षीच्या जुलै महिन्यात फेसबुकचे शेअर्स एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हल्यूपर्यंत पोहोचलं होतं. आता त्याची किंमत घसरली असून ती 920 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.
फेसबुकच्या या स्लोडाऊनमुळे त्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी आपले शेअर्स काढून घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे कंपनीला काही तासातस अब्जावधी रुपयांचा तोटा झाल्याचं दिसून आलं. downdetector.in या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास फेसबुकने काम करणं बंद केलं होतं.
फेसबुकनं या स्लोडाऊनवर यूजर्सची माफी मागितली आहे. कंपनीने काल ट्विटरवरुन दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, "आम्ही क्षमस्व आहोत. जगभरातील लोक आणि व्यवसाय आमच्यावर अवलंबून आहेत. आम्ही आमचे अॅप्स आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी मेहनत करत आहोत. आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. या कठीण प्रसंगी आमची साथ देण्यासाठी, धन्यवाद."
We’re aware that some people are having trouble accessing our apps and products. We’re working to get things back to normal as quickly as possible, and we apologize for any inconvenience.
— Andy Stone (@andymstone) October 4, 2021
दरम्यान, काल संध्याकाळी जगभरात अचानक व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात काम करेनासे झाले होते. सोमवारी रात्री 9.30 वाजता व्हॉट्सअॅपवर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या
महत्वाच्या बातम्या :