एक्स्प्लोर

Apple iPhone यूजर्ससाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून 5G सेवा वापरता येणार, जाणून घ्या

5G On APPLE iPhone In India : Apple iPhone यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी पुढील आठवड्यात iOS बीटा प्रोग्राम सुरू करणार आहे ,

5G On APPLE iPhone In India : Apple iPhone यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी पुढील आठवड्यात iOS बीटा प्रोग्राम सुरू करणार आहे. ज्यामुळे भारतीय यूजर्ससाठी 5G सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बीटा चाचणी दरम्यान, यूजर्स स्पीड टेस्ट करू शकतील. यासोबतच यूजर्सना फीडबॅक देण्याची सुविधाही मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Apple पुढील आठवड्यापासून म्हणजेच 7 नोव्हेंबर 2022 पासून iOS 16 बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम सुरू करणार आहे.

5G अपडेट लवकरच! ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
1 ऑक्टोबर रोजी देशात 5G सेवा अधिकृतपणे सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Apple पुढील आठवड्यात आपल्या आगामी iOS चे बीटा अपडेट जारी करेल, ज्यामुळे भारतीय यूजर्सना 5G सेवा वापरता येईल. 5G चे स्टेबल अपडेटला डिसेंबरमध्ये रोलआऊट केले जाईल. यासंदर्भात कंपनीने C-DOT च्या सदस्यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांना बीटा अपडेट रोलआउटबद्दल माहिती दिली आहे. 

अ‍ॅपलचा टेलिकॉम कंपन्यांसोबत समन्वय
Apple 5G सेवेसाठी देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांशी समन्वय साधून काम करत आहे . कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेटवर्क आणि गुणवत्ता चाचणी पूर्ण होताच, 5G शी संबंधित एक स्टेबल अपडेट जारी करू, जेणेकरून यूजर्स ही सेवा वापरू शकतील. Apple Beta Software Program वापरण्‍यासाठी, तुमच्‍या iPhone पब्लिक बीटामध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी नॉमिनेट करणे आवश्‍यक आहे. ऍपल बीटा सॉफ्टवेअर प्रोग्रामबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी युजर्स beta.apple.com ला भेट देऊ शकतात.

 

Jio आणि Airtel यूजर्सना 5G सेवा मिळणार
बीटा प्रोग्राम अंतर्गत, जिओ आणि एअरटेलचे यूजर्स पुढील आठवड्यापासून 5G सेवा वापरण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर आगामी iOS अपडेटमध्ये यूजर्सना नवीन फीचर्स देखील मिळतील.

या iPhones ला 5G सेवा मिळणार
iPhone 14 सीरीज
iPhone 13 सीरीज
iPhone 12 सीरीज
iPhone SE (3rd Generation)

Android यूजर्सही लवकरच 5G सेवा वापरू शकणार

मिळालेल्या माहितीनुसार, Apple व्यतिरिक्त, Xiaomi, Oppo, Vivo, Samsung आणि Realme त्यांच्या यूजर्सना 5G सेवा देण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट रोल आउट करण्याच्या तयारीत आहेत. असा अंदाज वर्तवला जात आहे की, 5G चे अपडेट या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज केले जाईल. मात्र, कंपन्यांनी अद्याप या अपडेटबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Embed widget