iPhone Production Stop : iPhone आणि iPad चा होणार तुटवडा? कंपनीने केले 'या' कारणामुळे उत्पादन बंद
iPhone Production Stop : गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच आयफोन (iPhone) आणि आयपॅड (iPad) चे उत्पादन Apple कंपनीने बंद केले आहे.
![iPhone Production Stop : iPhone आणि iPad चा होणार तुटवडा? कंपनीने केले 'या' कारणामुळे उत्पादन बंद apple shut down production of iphone and ipad for the first time in over 10 years iPhone Production Stop : iPhone आणि iPad चा होणार तुटवडा? कंपनीने केले 'या' कारणामुळे उत्पादन बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/09/c4f6de9d18fe4e66026a94823e5cc897_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
iPhone Production Stop : Apple कंपनीच्या फोन आणि आयपॅड्ला अनेकांची पसंती मिळाली आहे. Apple कंपनीचा आयफोन केवळ फिचर्समुळं नव्हे तर त्याच्या किंमतीमुळंही जगभर प्रसिद्ध आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच आयफोन (iPhone) आणि आयपॅड (iPad) चे उत्पादन Apple कंपनीने बंद केले आहे. कंपनीने हे करण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. कंपनीने सांगितले की, पार्ट्सची कमतरता, सप्लाय चेनमध्ये व्यत्यय आणि चीनमध्ये मर्यादित वीजेचा वापर या सर्व कारणांमुळे प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं Apple कंपनीने एका रिपोर्टमध्ये सांगितलं. एका रिपोर्टनुसार, उत्पादन बंद केल्याने कंपनीचा लेटेस्ट फोन आयफोन 13 सीरिजचे उत्पादन देखील ठप्प झाले आहे.
रिपोर्टनुसार, आतापर्यंतच्या सर्व समस्यांचे व्यवस्थापन करून कंपनीने त्यांच्या प्रोडक्ट्सचे उत्पादन सुरू ठेवले होती, पण आता कंपनीला उत्पादन सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे Apple कंपनीने आयफोन आणि आयपॅड उत्पादन बंद केले आहे. तसेच कंपोनंट्सच्या शॉर्टेजमुळे उत्पादन थांबण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागला.
गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये विजेच्या वापराबाबत अनेक निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनीच्या प्रोडक्शन उत्पादनावरही परिणाम होत आहे. त्यामुळे तूर्तास उत्पादन थांबविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
एका दशकातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सप्लाय चेनमध्ये व्यत्यय आल्याचा फटका थेट फटका बसला. त्यामुळे कंपनीला प्रोडक्ट्सचे उत्पादन थांबवावे लागले. याआधी कंपनी सप्लायर्सकडून अॅडव्हान्स प्रोडक्ट्स मागवून घेत असत. त्यामुळे उत्पादन कधीही थांबले नव्हते. त्यामुळे आता iPhone आणि iPad चा तुटवडा होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
इतर बातम्या :
Wifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात?, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)