एक्स्प्लोर
Advertisement
iPhone यूजर्ससाठी खुशखबर, 'या' नव्या फिचर्ससह iOS 13 लाँच
OS 13 मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. नव्या ऑपरेटिंग सिस्टिमचा फोनच्या परफॉर्मन्सवरही चांगला परिणाम होणार आहे.
अॅपलच्या WWDC 2019 मध्ये iOS 13 ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम लाँच करण्यात आली आहे. यावेळी नव्या ऑपरेटिंग सिस्टीममधील खास फिचर्सचीही घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयपॅडसाठीच्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमचीही यावेळी घोषणा करण्यात आली आहे.
iOS 13 मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. नव्या ऑपरेटिंग सिस्टिमचा फोनच्या परफॉर्मन्सवरही चांगला परिणाम होणार आहे. iOS 13 मुळे आयफोन मधील फेस आयडीसह फोनमधील अॅप्स आणखी फास्ट होणार आहेत.
डार्क मोड
iOS 13 च्या या फिचरची बरीच चर्चा आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टीममधील डार्क मोड हा सगळ्या अॅप्स साठी उपलब्ध असणार आहे.
किबोर्ड
iOS 13 मध्ये किबोर्ड अपडेट करण्यात आला आहे. लेटेस्ट किबोर्डमध्ये 'स्वाइपट फिचर देण्यात आले आहे. हे फिचर असलेले अनेक थर्ड पार्टी अॅप्स अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. बऱ्याच युजर्सकडून या अॅप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर देखील करण्यात येतो. त्यामुळे अॅपलने इनबिल्ट किबोर्डमध्ये या फिचरचा समावेश केला आहे.
मॅप्स
अॅपल मॅप्समध्ये देखील नवीन बदल करण्यात आले आहेत. 'गुगल स्ट्रीट व्ह्यू' हे या अॅपचं आकर्षण असणार आहे. सुरुवातीला काही मोजक्या शहरांत हे फिचर उपलब्ध असणार आहे. हे फिचर 2019 च्या शेवट पर्यंत संपूर्ण अमेरिकत तर 2020 मध्ये जगभरात वापरता येणार आहे.
प्रायवसी
स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या डेटाची प्रायवसी. iOS 13 मध्ये अॅपलकडून प्रायवसीसंदर्भात मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये फोनमधील अॅपसाठी लोकेशन शेअरिंग बाबतचेही अपडेट आहे. त्यामुळे एखाद्या अॅपसोबत आपले लोकेशन शेअर करताना फक्त ठराविक वेळेपुरतं शेअर करता येणार आहे. तसेच अॅपलकडून Sign in with Apple हे फिचर देखील आणण्यात येत आहे. यामुळे फेस आयडी वापरुन वेगवेगळ्या अॅप्स आणि सेवांसाठी अकाउंट ओपन करता येणार आहे.
फोटो व्हिडीओ एडिटिंग
अॅपलने iOS 13 मध्ये फोटो आणि व्हिडीओ एडिटिंग टूलचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे बेसिक फोटो एडिटिंगसाठी थर्ड पार्टी अॅप वापरण्याची गरज पडणार नाही. तसेच व्हिडीओ रोटेट करणे शक्य होणार आहे.
iOS 13 मध्ये मेसेजिंग अॅपमध्ये देखील व्हॉट्सअॅप सारखे प्रोफाईल पिक्चर आणि डिस्प्ले नेम देता येणार आहे. यापुर्वी असलेले 'फाइंड माय फ्रेंड' आणि 'फाइंड माय फोन' हे अॅप एकत्र करण्यात आले आहेत. या नव्या अॅपमध्ये अॅपलचे सगळे ट्रॅकिंग टूल एकाच जागी वापरता येणार आहेत. यासह अॅपलच्या सफारी या ब्राउजरमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.
iOS 13 चे अपडेट iPhone 5s आणि iPhone 6 साठी उपलब्ध नसणार आहेत. आयफोन 6s आणि त्यापुढच्या फोनसाठी या नव्या ओसचे अपडेट मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
राजकारण
राजकारण
Advertisement