(Source: ECI/ABP News/ABP Majha)
iPhone SE 3 Launch Date: आयफोन एसई 3 ची लॉन्चिंग तारीख लीक, लवकरच बाजारात दाखल होणार
iPhone SE 3 Launch Date: ॲपलची स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ असून प्रत्येकालाच आयफोन खरेदी करायची इच्छा असते.
iPhone SE 3 Launch Date: अमेरिकन कंपनी ॲपलचा सर्वात स्वस्त आयफोन कधी लॉन्च होतोय? याची प्रत्येकाला उस्तुकता लागलीय. यातच आयफोन एसई 3 ची लॉन्चिंग तारीख लीक झालीय. त्यानुसार, आयफोन एसई 3 याच वर्षी भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आयफोन एसई 3 ला आयफोन एक्सआरसारखं डिझाईन केलं जाईल, अशीही माहिती समोर आलीय.
ॲपलची स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ असून प्रत्येकालाच आयफोन खरेदी करायची इच्छा असते. परंतु, ॲंड्राईडच्या तुलनेत आयफोनची किंमत अधिक असल्यानं अनेकांचं आयफोन खरेदी करता येत नाही. अशाच ग्राहकांसाठी ॲपल कंपनी त्यांचा आयफोन एसई बाजारात घेऊन येत आहे. ॲपलचा आयफोन एसई कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. आयफोन एसई खरेदी करण्यासाठी स्मार्टफोन चाहत्यांना जास्त वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही.
आयफोन एसई किंवा आयफोन एसई असं या स्मार्टफोनला नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 400 डॉलर म्हणजेच जवळपास 29,590 रुपये असू शकते. ॲपलचा आयफोन एसई 2016 मध्ये लॉन्च झाला होता. त्यानंतर स्मार्टफोन चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयफोन एसई डिझाइन करण्यात आलं होतं. या स्मार्टफोनमध्ये आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लस यांसारखी फिचर्स देण्यात आली होती. आता कंपनीनं 2020 आयफोन एस2 ची पुनरावृत्ती केली. त्यानंतर कंपनीनं त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयफोन एसई 3 लॉन्च करणार आहे.
संभाव्य फिचर्स
आयफोन एसईमध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तसेच तसेच समोरच्या बाजूला टच आयडी बटण देखील दिले जाऊ शकते. आयफोन 8 मध्ये हे फिचर्स पाहायला मिळतं. आयफोन एसईमध्ये 3 जीबीपर्यंत रॅम दिला जाऊ शकतो. याशिवाय A15 बायोनिक चिपसेट उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
स्मार्टफोन कंपन्यांचं नुकसान होण्याची शक्यता
हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी पसंती मिळवेल. तसेच या स्मार्टफोनमुळं इतर स्मार्टफोन कंपन्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण, ॲपलचे स्मार्टफोन इतर स्मार्टफोनच्या तुलनेत अधिक महागात असतात. यामुळं मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन चाहते अन्य कंपनीचा स्मार्टफोन खेरदी करण्याचा निर्णय घेतात. हे लक्षात घेऊनच ॲपलनं त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणण्याचा विचार केला असावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.
हे देखील वाचा-
- Motorola New Smartphone : Motorola चा 200 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह स्मार्टफोन लवकरच बाजारात
- Amazon Smart Phone Deal : 10 हजारांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन घ्यायचाय? 'हे' पर्याय नक्की बघा
- Samsung Galaxy : Samsung Galaxy Tab A8 भारतात झाला लॉन्च, दोन हजारांची सूट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha