Amazon Smart Phone Deal : 10 हजारांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन घ्यायचाय? 'हे' पर्याय नक्की बघा
Best Smart Phone : 10 हजारांपेक्षा कमी किमतीत अॅमेझॉनवर स्मार्टफोन उपलब्ध आहे.
Amazon Offer On Smartphone : अॅमेझॉनवर टॉप ब्रँडचे फोन 10 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. तसेच हे फोन खरेदी केल्यावर एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे. EMI वरदेखील हा फोन खरेदी करू शकता. तसेच काही क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 10% सूट मिळू शकते. नवीन फोनच्या खरेदीवर 6 महिन्यांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देण्यात आली आहे.
Tecno Spark 8 Pro या फोनची किंमत 13,499 रुपये आहे. परंतु ऑफरमध्ये हा फोन 10,599 रुपयांत उपलब्ध आहे. Axis आणि More च्या क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या फोनवर 9,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील आहे. या फोनवर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे.
Tecno Spark 8 Pro मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असून 48MP प्रायमरी सेन्सर कॅमेरा आणि 2MP सेकेंडरी सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8MP मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 6.8 इंचाचा फुल-एचडी + डॉट-इन डिस्प्ले आहे. तसेच 5000 mAh बॅटरी आहे.
Redmi 9 Activ हा फोनदेखील ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. 10,999 रुपयांचा हा फोन अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये 9,499 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनचा मुख्य कॅमेरा 13+2 MP आहे आणि फ्रंट कॅमेरा AI पोर्ट्रेटसह 5 MP आहे. या फोनचा प्रोसेसर ऑक्टा-कोर हेलिओ आहे. फोनमध्ये 5000 mAH बॅटरी आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह ड्युअल सिमचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
कमी किमतीत ग्राहकांना खूप आवडणारा एक फोन म्हणजे realme narzo 50i. हा फोन अॅमेझॉनच्या सेलमध्ये 7,999 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 8MP तर 5MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
संबंधित बातम्या
Amazon Deal : बायको किंवा गर्लफ्रेंडला खुश करायचंय? Fossil Women Watch वर मिळतेय चक्क 60 टक्के डिस्काऊंटची बंपर ऑफर
Samsung Galaxy : Samsung Galaxy Tab A8 भारतात झाला लॉन्च, दोन हजारांची सूट
Twitter New Features : आता Twitter Spaces ची करू शकता 'रेकॉर्डिंग', कंपनीने लॉन्च केले नवीन फीचर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha