Apple ने लॉन्च केला स्वस्त iPhone SE, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
अॅपलने स्वस्त आयफोन लॉन्च केला लॉन्च केला असून हा फोन 4.7 इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात दाखल झाला आहे. हा कॉम्पॅक्ट फोन आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेतील टेक कंपनी अॅपलने आपला स्वस्त iPhone SE लॉन्च केला आहे. हा फोन 4.7 इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात दाखल झाला आहे. हा कॉम्पॅक्ट आहे. अनेकदा या स्वस्त आयफोनबाबत माहिती मिळाली आहे. नवीन आयफोन एसई तीन व्हेरियंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. जाणून घेऊया या स्वस्त आयफोनचे फीचर्स आणि किंमत...
Apple iPhone SE च्या किमती :
- Apple iPhone SE 64GB : $399 (जवळपास 30,562 रुपये)
- Apple iPhone SE 128GB: $449 (जवळपास 34,392रुपये)
- Apple iPhone SE 256GB: $499 (जवळपास 38,222रुपये)
Apple iPhone SE ची प्री-बुकिंग 17 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तसेच अॅपलने लॉन्च केलेला हा स्वस्त आयफोन विक्रीसाठी 24 एप्रिलपासून उपलब्ध करण्यात येणार आहे.
डिझाइन आणि डिस्प्ले
नव्या iPhone SE मध्ये 4.7 रेटिना HD HDR10 डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एखाद्या पेपरप्रमाणे दिसतो. म्हणजेच, तुम्ही कितीही वेळ मोबाईल वापरला तरिही तुमच्या डोळ्यांना त्याचा त्रास होणार नाही. तसेच या फोनमध्ये फोटो काढण, गेम खेळणं आणि व्हिडीओ पाहणं एक गंमतीशीर अनुभव देणारं ठरेल. iPhone SE चं डिझाइन iPhone 8 प्रमाणे आहे. म्हणजेच, डिझाइनमध्ये काहीच नाविण्य देण्यात आलेलं नाही. या फोनच्या बॉडिमध्ये एयरोस्पेस ग्रेड अॅल्यूमिनियम आणि ड्यूरेबल ग्लासचा वापर करण्यात आला आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी iPhone SE मध्ये 12MPचा सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. जो ƒ/1.8 अपर्चरसोबत आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 7MPचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनचा रिअर कॅमेरा 5X डिजिटल झूम करून शकता. या कॅमेरामध्ये 4K व्हिडीओ शूट केला जाऊ शकतो. फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी नवा iPhone SE एक चांगला स्मार्टफोन आहे.
परफॉर्मन्स
परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये Apple A13 Bionic प्रोसेसर आहे. हाच फ्रोसेसर iPhone 11मध्येही आहे. हा फोन iOS 13वर काम करतो. यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर होम बटनसोबत देण्यात आला आहे, हा फोन वायरलेस चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वॉटर प्रूफ आहे आणि याला IP67 रेटिंग मिळाली आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे.
संबंधित बातम्या :
Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर? 5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य
#Aarogyasetu | सरकारकडून 'आरोग्य सेतु' अॅप लॉन्च, कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणारं अॅ