Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर?
सोशल मीडियावर अनेक व्हायरल मेसेज फॉरवर्ड होत असतात. गेल्या काही दिवसांपासून असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये सरकार आपल्या व्हॉट्सअॅप मेसेजवर लक्ष ठेवत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
![Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर? Fact Check Coronavirus government spying on all your whatsapp messages pib did the fact check Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/08152129/whatsapp-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच याबाबत सोशल मीडियावर अनेक चुकीचे मेसेज, माहिती फॉरर्वड करण्यात येत आहेत. एवढचं नाहीतर इंटरनेटवर सरकार आपल्या व्हॉट्सअॅप मेसेजवर नजर ठेवून असल्याच्याही मेसेज फॉरर्वड केले जात आहेत. तेच आता सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच, PIBने फॅक्ट चेक करत याबाबत खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत होता. त्यामध्ये सरकार आपल्या प्रत्येक मेसेजवर नजर ठेवून असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच तुम्ही कोणालाही WhatsApp मेसेज पाठवला तर एक खुण दिसते. जेव्हा हा मेसेज समोरच्याकडे पोहोचतो त्यावेळी दोन खुणा दिसतात. तसेच जर तुम्ही ज्याला मेसेज पाठवला आहे, त्याने मसेज वाचला तर या दोन खुणा निळ्या होतात.
याव्यतिरिक्त पुढे या फोटोमध्ये लिहिलं आहे की, ' 1 निळी खुण + 2 लाला खुणा, म्हणजे सरकार तुमच्या डेटाची तपासणी करत आहे. 2 निळ्या + 1 लाल खुण म्हणजे सरकार तुमच्या विरोधात कारवाई करू शकते. 3 लाल खुणा म्हणजे, सरकारने कारवाई सुरू केली असून युजरला कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात येणार.'
भारत सरकारच्या प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोने ही माहिती पूर्णपणे चुकीची असून सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. PIB ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एक ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. तसेच ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, 'ही माहिती पूर्णपणे चुकीची असून सरकारद्वारे असं काहीही केलं जात नाही.'
दरम्यान, व्हॉट्सअॅप सध्या खोट्या बातम्या, माहिती पसरवणाऱ्या साधनांपैकी एक महत्त्वाचं साधन बनलं आहे. कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये होणाऱ्या वाढिसोबतच या प्लॅटफॉर्मला खोट्या बातम्यांपासून वाचवणं आणि खोट्या बातम्या, माहिती पसरवणं अधिक महत्वाचं ठरलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपने आपल्या फ्रिक्वेंटली फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणल्या आहेत.
संबंधित बातम्या :
5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य
#Aarogyasetu | सरकारकडून 'आरोग्य सेतु' अॅप लॉन्च, कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणारं अॅप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)