एक्स्प्लोर

#Aarogyasetu | सरकारकडून 'आरोग्य सेतु' अॅप लॉन्च, कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणारं अॅप

आरोग्यसेतु अॅपद्वारे घरबसल्या आपली कोरोना चाचणी देखील करता येते. हे अॅप कोविड 19 पासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करतं. आरोग्य सेतु हे अॅप 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून आरोग्य सेतू नावाचं अॅप लॉन्च केलं आहे. कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन करणारं हे अॅप नॅशनल इंफोममेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या अॅपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स सेंटरच्या अधिकारी नीता वर्मा यांनी सांगितलं. हे अॅप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड केलं जाऊ शकतं. हे अॅप तुम्हाला कोरोनापासून वाचण्यासाठी मदत करणार आहे. कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचं काम या अपद्वारे केलं जाणार आहे. हे अॅप युझरच्या फोनचे ब्लुटूथ, लोकेशन आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात तर आला नाही ना? या गोष्टी ट्रेस करतं.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता 'डिजिटल प्लॅटफॉर्म', संशयित व्यक्तींचं होणार जिओ मॅपिंग

कोरोना व्हायरस विरोधातील या लढाईत जगभरात वेगवेगळे शोध लावले जात आहेत. देशात देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाविरोधात पूर्णपणे उतरले आहेत. COVID-19 ला ट्रॅक करण्यासाठी वेगवेगळे अॅप विकसित केले जात आहेत. नुकतेच केंद्र सरकारने कोरोना कवच नावाचं अॅप लॉन्च केलं होतं. आता आरोग्य सेतू नावाचं अप सरकारने लॉन्च केलं आहे. हे अॅप कोरोना ट्रेकर अॅप आहे. या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्याला कोरोना आहे की नाही हे तपासू शकता. आरोग्य सेतू अॅपचा असा करा वापर  
  • आरोग्य सेतू अॅप वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.
  • फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.
  • हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अॅप आहे
  • इंटर झाल्यानंतर अॅप आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.
  • आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो
  • अॅप उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारलं जातं. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.
  • यानंतर अॅपची भाषा निवडावी लागते
  • अपमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
  • आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.
  • या अॅपमध्ये इस युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.
काय आहेत खास फीचर्स आरोग्य सेतु अॅपमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय. तसेच दुसरं म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते. जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणं असतील तर हे अप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.

महापालिकांना क्वॉरन्टाईन रुग्णांची माहिती घरबसल्या मिळणार, दोन मराठमोळ्या तरुणांनी बनवले अॅप

अॅप डाऊनलोड करताना काळजी घ्या गुगल प्ले स्टोरवर ‘AarogyaSetu’ असं टाईप करा. हे अॅप  NIC (नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर) ने बनवलं आहे. प्ले स्टोरवर याच प्रकारचे काही बोगस अॅप देखील आहेत. त्यामुळं NIC ने पब्लिश केलेलं अॅपच घ्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget