एक्स्प्लोर
अॅपलचा नोकियाला दणका, स्टोअर्सवर विथिंग्सच्या उत्पादनांना बंदी
सॅन फ्रांन्सिस्को: फिनलॅण्डची स्मार्टफोन मेकर्स कंपनी नोकिया आणि अॅपलचे पेटंटवरुन सुरु असलेल्या वादवरुन आता अॅपलने कडक भूमिका घेतली आहे. कंपनीने आपल्या सर्व स्टोअर्सवरुन नोकियाची मालकी असलेल्या विथिंग्सची उत्पादने परत पाठवली असून, यामुळे नोकियाला जबरदस्त झटका बसला आहे.
अॅपलने विथिंग्सची कोणतीही उत्पादने ऑनलाईन आणि स्टोअर्सवर विक्री करण्यास नकार देण्याचे ठरवले आहे. 'अॅपलइनसायडर' या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून अॅपलच्या आयफोनला सपोर्ट करणारी विथिंग्सची उत्पादने अॅपलच्या स्टोअर्सवरुन विकली जात होती. पण याच वर्षी एप्रिलमध्ये नोकियाने विथिंग्सला 19 कोटी डॉलर्सना खरेदी केले. पण यानंतरही विथिंग्सच्या उत्पादनांची विक्री अॅपलच्या स्टोअर्सवरुन केली जात होती.
पण आता नोकियाची भागीदारी असलेल्या या कंपनीची उत्पादने अॅप्पलच्या वेबसाईटवरुन खरेदी करण्यात येणार नसल्याचे 'अॅपलइनसायडर'ने सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
वास्तविक, अॅपल आणि नोकियामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरु असून, अॅपलने नोकियाची तब्बल 32 पेटेंट चोरल्याचा आरोप करत कंपनीने अमेरिका आणि युरोपमध्ये याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे नोकियाने याच आठवड्यात पुन्हा अॅपल विरोधात आणखी एक दावा कोर्टात दाखल केला आहे. त्यामुळे ही न्यायालयीन लढाई आता आरयापारची झाली आहे.
नोकिया 2017 साली आपले स्मार्टफोन बाजारात उतरवणार असून, कंपनीकडे सध्या आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने फिनलॅण्डची कंपनी एचएमडी ग्लोबल आणि तायवानची फॉक्सकॉनच्या सहकार्याने आपले स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement