Amazon Prime Membership Price: अमेझॉन प्राईमच्या ग्राहकांना मोठा फटका, उद्यापासून मेंबरशिपसाठी मोजावे लागणार अधिक पैसे
Amazon Prime Membership Price: दरवाढीचा निवडक ग्राहकांवर काहीच परिणाम होणार नाही.
Amazon Prime Membership Price: ओटीटी अॅप अमेझॉन प्राईमवर कंटेंट बघणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आलीय. अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लानच्या किंमती उद्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, युजर्सला प्राईम मेंबरशिपसाठी 50 टक्के अधिक पैसे द्यावा लागणार आहेत. ज्यामुळं अमेझॉन प्राईमच्या ग्राहकांना मोठा फटका बसलाय. ज्या ग्राहकांनी ऑटो रिनेव्हल पर्याय निवडलाय त्यांच्यावर दरवाढीचा काहीही परिणाम होणार नाही.
अमेझॉननं ऑक्टोबर महिन्यात प्राइम मेंबरशिपच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. अमेझॉन प्राइम मेंबरशिपच्या नवीन किंमती 14 डिसेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, ग्राहक 13 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत जुन्या किमतींवर त्यांची मेंबरशिप वाढवू शकतात. मात्र, 14 डिसेंबरपासून अमेझॉन मेंबरशिपची वार्षिक किंमत 1 हजार 499 रुपये इतकी होईल. ज्यात पाचशे रुपयांनी वाढ होईल. परंतु, अमेझॉनच्या मेंबरशिपच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम निवडक ग्राहकांवर होणार नाही, ज्यांनी ऑटो रिनव्हल पर्याय निवडला आहे. त्यांच्यावर महागाईचा भार पडणार नाही.
अमेझॉन प्राईम मेंबरशिपचे नवे दर काय असतील?
अमेझॉनचा मासिक प्लान 129 रुपयांऐवजी 179 रुपयांचा असेल. तीन महिन्यांच्या प्लानसाठी 329 रुपयांऐवजी 459 रुपये खर्च करावे लागतील. तर वार्षिक प्लान 14 डिसेंबरनंतर 1 हजार 499 रुपयांमध्ये येईल, जो सध्या 999 रुपयांमध्ये येतो. म्हणजे वार्षिक प्लानमध्ये 500 रुपयांची वाढ होईल.
अॅमेझॉन गेल्या पाच वर्षांपासून समान रक्कम आकारत आहे आणि या दरवाढीचा कोणताही तपशील जाहीर केला नाही. कोरोना महामारीच्या काळात, अॅमेझॉनने प्लॅटफॉर्मवर अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दरम्यान, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासारख्या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी त्यांच्या प्रीपेड पॅकच्या किंमती वाढवल्या आहेत. ज्यामुळं सर्व सामन्यांच्या खिशाला कात्री लागलीय.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha