(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमेझॉन प्राईवरील द फॅमिली मॅन'चा बहुप्रतीक्षित नव्या सीजनचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला
अमेझॉन प्राईम व्हिडिओचा अमेझॉन ओरिजिनल 'द फॅमिली मॅन'चा बहुप्रतीक्षित नव्या सीजनचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमेझॉन प्राईम व्हिडिओ आपली क्रिएटर जोडी, राज एंड डीकेसोबत नव्या सीजनच्या ट्रेलरची एक रोमांचित करणारी बातमी घेऊन येत आहेत. अमेझॉन ओरिजिनल सीरीज 'द फॅमिली मॅन'च्या या नव्या सीजनच्या ट्रेलरचे अनावरण उद्या करण्यात येणार आहे.
नव्या सीजनमध्ये, देशाचा लाडका फॅमिली मॅन उर्फ श्रीकांत तिवारी उर्फ मनोज बाजपेयी, अखेरीस आपल्या बहुप्रतीक्षित अॅक्शन स्पाई थ्रिलरसोबत परतत आहे. यावेळी, हा संघर्ष, अधिक इंटेंस असणार आहे. कारण हा आता केवळ आपले कुटुंब आणि डिमांडिंग प्रोफेशनल आयुष्य यांच्या संतुलनासाठीचा संघर्ष असणार नाही तर त्याला एका नव्या नेमसिस 'राजी' (सामंथा अक्किनेनी द्वारा निबंध) शी दोन हात करावे लागणार आहेत.
kal kuch aisa hone wala hai jiske baare mein hum soch bhi nahi sakte 🤯
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) May 18, 2021
Trailer out tomorrow! #TheFamilyManOnPrime@SrikantTFM @rajndk @BajpayeeManoj @Samanthaprabhu2 @Priyamani6 @sharibhashmi @sumank @Suparn @shreya_dhan13 @hinduja_sunny @DarshanKumaar @SharadK7 @ishahabali pic.twitter.com/UjarU0LwzM
या पुरस्कार विजेत्या अमेझॉन ओरिजिनल सीरीजसोबत दक्षिण सुपरस्टार सामंथा अक्किनेनी आपला डिजिटल डेब्यू करत आहे, पद्मश्री विजेता मनोज बाजपेयी, प्रियामणि यांच्या सोबत दिसणार आहे. या सोबतच, शारिब हाशमी, सीमा विश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धनवंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकुर सारखे प्रतिभावान कलाकार असणार आहेत. या सिरीजमध्ये तामिळ सिनेमातील अफलातून कलाकार, माइम गोपी, रवींद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंदसामी आणि एन. अलगमपेरुमल देखील असणार आहेत.
‘द फॅमिली मॅन’ एक वेगवान, अॅक्शन-ड्रामा सीरीज आहे. ही मध्यमवर्गीय श्रीकांत तिवारीची कहाणी असून तो राष्ट्रीय शोध पथकाच्या एका विशेष सेलसाठी काम करतो. या सीरीजमध्ये श्रीकांतचे मध्यमवर्गीय त्रस्त जीवन दाखवण्यात आले असून ज्यामध्ये सीक्रेट्स, कमी उत्पन्न, मोठ्या जबाबदारीची नोकरी त्यातील दडपण आणि एक पति आणि पिता यांमध्ये संतुलन आणण्यासाठी संघर्ष करतो आहे. ही एका मध्यवर्गीय व्यक्तिची कहाणी आहे जो जागतिक दर्जाचा हेर आहे.
डी 2आर फिल्म्सद्वारे निर्मित, हा बहुप्रतीक्षित शो लवकरच 240 हुन अधिक देश आणि प्रदेशांमध्ये विशेष रूपाने अमेझॉन प्राईम व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे.