एक्स्प्लोर
जिओला टक्कर, या वर्षा अखेरपर्यंत एअरटेलची VoLTE सेवा
![जिओला टक्कर, या वर्षा अखेरपर्यंत एअरटेलची VoLTE सेवा Airtel Volte Launch Planned For Later This Year Says Ceo Gopal Vithal जिओला टक्कर, या वर्षा अखेरपर्यंत एअरटेलची VoLTE सेवा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/11092637/airtel-580x3951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी एअरटेलची व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केली जाईल. सध्या पाच शहरांमध्ये या सेवेची चाचणी सुरु आहे, अशी माहिती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत-दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी दिली.
एअरटेलने नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘प्रोजेक्ट नेक्स्ट’ या सेवेची सुरुवात केली. पोस्टपेड ग्राहक यावर्षी ऑगस्टपासून या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
काय आहे ‘प्रोजेक्ट नेक्स्ट’?
पोस्टपेड ग्राहकांचा महिला संपल्यानंतर प्लॅनमधील उरलेला 3G किंवा 4G डेटा पुढच्या महिन्यात दिला जाईल. मात्र ग्राहकांना यासाठी एक अट असेल. तोच प्लॅन पुढेही चालू ठेवावा लागेल, जो अगोदरच्या महिन्यात चालू होता. अन्यथा डेटाची मुदतवाढ मिळणार नाही.
एअरटेलची VoLTE सेवा महत्वाची का?
भारतात VoLTE सेवा देणारी रिलायन्स जिओ एकमेव कंपनी आहे. जिओचे देशभरात 12 कोटी ग्राहक आहेत. जिओने कंपन्यांसमोर तगडं आव्हान उभं केल्यानंतर ग्राहकांना VoLTE सेवा देण्यासाठी इतर कंपन्यांही सरसावल्या आहेत.
VoLTE ही अशी सुविधा आहे, ज्यामुळे डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करता येते. म्हणजेच तुमच्या डेटा पॅकमध्येच तुम्ही कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता. VoLTE सेवेत ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळते.
एअरटेलने VoLTE सेवा सुरु केल्यानंतर ही सेवा देणारी एअरटेल जिओनंतर दुसरी कंपनी ठरेल. तर व्होडाफोनही लवकरच VoLTE सेवा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
बीड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)