एक्स्प्लोर
फेसबुकनंतर आता यूट्यूब वादाच्या भोवऱ्यात
अमेरिकेतील 23 संस्थांनी मिळून यूट्यूबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे. वय वर्षे 13 पर्यंतच्या मुलांच वैयक्तिक माहिती गोळा करुन, बालसुरक्षा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप या संस्थांनी केला आहे.
न्यूयॉर्क : फेसबुक आणि केम्ब्रिज अनॅलिटिकाच्या डेटा चोरी वादानंतर आता इंटरनेटवरील व्हिडीओ सर्च इंजिनच्या जगतातील जायंट मानल्या जाणाऱ्या यूट्यूबलाही वादाने घेरले आहे. अमेरिकेतील 23 संस्थांनी मिळून यूट्यूबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे. वय वर्षे 13 पर्यंतच्या मुलांची वैयक्तिक माहिती गोळा करुन, बालसुरक्षा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप या संस्थांनी केला आहे.
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लाढणाऱ्या संस्था, सजग ग्राहक आणि वैयक्तिक माहितीचं संरक्षण व्हावं अशी भूमिका असलेले गट अशा एकण 23 संस्थांनी मिळून यूट्यूबविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संस्थांच्या ग्रुपमध्ये कमर्शियल-फ्री चाईल्डहूड (CCFC) आणि सेंटर फॉर डिजिटल डेमोक्रसी या महत्त्वाच्या आणि मोठ्या संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे अर्थात यूट्यूबविरोधातील तक्रारीचं वजन वाढलं आहे.
व्हिडीओ पाहणाऱ्या 13 वर्षांखालील मुलांकडून गुगल कंपनी त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करते. लोकेशन, डिव्हाईस, आयडेन्टिफायर्स आणि फोन नंबर अशी मुलांच माहिती गोळा केली जाते आणि त्यांना इतर वेबसाईट किंवा सर्व्हिससाठी ट्रॅक केले जाते. अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे (Coppa) हे उल्लंघन असल्याचे या तक्रारदार संस्थांच्या ग्रुपचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी फेसबुक हे सोशल मीडियातील जायंट अशाच प्रकारच्या गोष्टीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. केम्ब्रिज अनॅलिटिका या कंपनीला युजर्सचा डेटा दिल्याचा आरोप फेसबुकवर झाला होता. जगभरात या प्रकारामुळे धुमाकूळ माजला होता. त्यानंतर आता यूट्यूबही संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याने पुन्हा डिजिटल सिक्युरिटीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement