(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधार कार्ड केंद्रावर जाण्याचा त्रास संपला! FaceRD अॅप लाँच, आता हे काम घरबसल्या होणार
Face Rd App: आधार कार्डधारक आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची ओळख कन्फर्म करू शकतात. यासाठी एक अॅप लाँच करण्यात आले आहे.
Face Rd App: आधार कार्डधारक आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची ओळख कन्फर्म करू शकतात. यासाठी एक अॅप लाँच करण्यात आले आहे. कंपनीने याला आधार FaceRD असे नाव दिले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) हे लॉन्च केले आहे.
अँड्रॉईड युजर्स हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे अॅप आधार ऑथेंटिकेशनसाठी एखाद्या व्यक्तीचा चेहरा थेट कॅप्चर करते. फेस ऑथेंटिकेशनचा वापर अनेक आधार प्रमाणीकरण अॅप्सद्वारे केला जाऊ शकतो. ज्यात जीवन प्रमाण, रेशन वितरण (PDS), CoWin लसीकरण अॅप, शिष्यवृत्ती योजना, शेतकरी कल्याण योजनेचा समावेश आहे. UIDAI ने 12 जुलै रोजी याबाबत ट्वीट देखील केले होते.
#FaceAuthentication
— Aadhaar (@UIDAI) July 12, 2022
Residents are now using the #Aadhaar Face Authentication feature by downloading the #UIDAI #RDApp, which can be used for various #Aadhaar Authentication Apps like #JeevanPraman, #PDS, #Scholarship schemes, #COWIN, #FarmerWelfare schemes.@GoI_MeitY @ceo_uidai pic.twitter.com/c5cZNXEGOz
ट्विटमध्ये सांगण्यात आले होते की, UIDAI RD अॅपद्वारे आधार फेस ऑथेंटिकेशन फीचरचा वापर केला जाऊ शकतो. हे अनेक आधार प्रमाणीकरण अॅप्ससाठी वापरले जाऊ शकते. आधार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान UIDAI ने स्वतः विकसित केले आहे. Livemint च्या अहवालानुसार, या अॅपसह आधार धारकांना यापुढे लोकेटर आधार नोंदणी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. तसेच फिंगरप्रिंट स्कॅन देखील यावरच करता येईल. दरम्यान, हे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून आधार FaceRD डाउनलोड करावे लागेल. यानंतर अॅपवर सांगितलेल्या मार्गदर्शकाचे अनुसरण करा आणि पुढे जा वर क्लिक करा. चेहरा प्रमाणीकरणासाठी, तुमचा चेहरा प्रकाशात असावा आणि तुमचा बॅकग्राऊंड स्पष्ट असावी.
इतर महत्वाच्या बातम्या:
ओप्पोचा पहिला टॅबलेट उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Twitter Deal Row : ट्विटर डीलचा वाद चिघळणार? एलॉन मस्क यांची पराग अग्रवालांना धमकी