Nagpur News: शेतकऱ्यांच्या शेतमालाची होणारी नासाडी रोखण्यासाठी रानडुक्कर अन् रोहिंची नसबंदी? भाजप आमदाराचा सूतोवाच, म्हणाले..
Nagpur News: शेतमालाची होणारी नासाडी थांबवण्यासाठी रानडुक्कर व रोही यांची नसबंदी करण्याचा सूतोवाच सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुख केला आहे.

Nagpur News: रानडुक्कर आणि रोही(नीलगाय) यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची होणारी नासाडी थांबवण्यासाठी रानडुक्कर व रोही यांची नसबंदी करण्याचा सूतोवाच सावनेरचे भाजप (BJP) आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) केला आहे. काटोल तालुक्यातील सावरगाव येथे आयोजित शंकरपटाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले. शेतकऱ्यांना माकडांचा पण खूप त्रास आहे. आम्ही भाजपचे आमदार आहोत, त्यामुळे माकडांची शिकार करणार नाही, मात्र माकडांच्या स्थलांतराची मागणी वन विभागाकडे करणार असल्याचे ही आशिष देशमुख यांनी सांगितले.
आम्ही भाजपचे आमदार आहोत, माकडांची शिकार करणार नाही- आशिष देशमुख
आपल्या सरकारने वीज बिल माफ केलं. विज मीटरसाठी एकही पैसा मोजावा लागत नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला. लाडक्या बहीणींचे पैसे देणं चालू आहे. त्यामुळे त्यांनी ही आम्हाला आशीर्वाद दिला आहे. किंबहुना शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मोठा त्रास आहे. सावरगाव येथे देखील वानरांचा मोठा उच्छाद आहे. त्यांच्या बंदोबस्त केला पाहिजे. मात्र आम्ही भाजपचे आमदार आहोत, त्यामुळे आम्ही त्यांना मारणार नाही. मात्र रानडुक्कर आणि रोही(नीलगाय) यांचं फॅमिली प्लॅनिंग केलं पाहिजे असे वक्तव्य सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे. शंकरपटाच्या कार्यक्रमात हासीमजाक केला पाहजे असेही ते बोलतांना विसरले नाहीत. त्यामुळे या वक्तव्याचा नेमका अर्थ काय हे स्पष्ट होऊ शकले नाहीये.
शेतकऱ्यांच्या शेतातील मका, हरभरा सुडीला अज्ञाताने लावली आग, लाखोचं नुकसान
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरानजीक बेलाड मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने जवळपास 15 ते 16 शेतकऱ्यांचे शेतात हरभरा आणि मका या पिकांच्या सुडीला आग लावली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षापासून याच दिवसात या परिसरात अनेकदा अशा अज्ञाताने आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र तरीही पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान झालेलं आहे.
दुर्मिळ पिवळ्या पळसाची झाडे नवीन रस्ता विकासकामत झाली नष्ट
वाशिम जिल्ह्यात कारंजा अमरावती महामार्गाच्या विकास कामादरम्यान कामारगाव दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कडेला दुर्मिळ असलेले पिवळ्या पळसाचे वृक्ष नष्ट झाले आहे. ही दुर्मिळ वृक्ष नष्ट झाल्याने पर्यावरण प्रेमींचा हिरमोड झालाय. तर त्यामुळे पर्यावरण प्रेमीकडून नाराजी व्यक्त होतय. तंत्रज्ञान अद्यावत झाले असतांना वृक्ष संवर्धनासाठी त्याचा वापर करणे गरजेचे असतांना कामाच्या घाईत बहुमूल्य वृक्ष तोडल्या जात असल्याने परिसरात या बद्दल नाराजी व्यक्त होतय.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

