Temple Reopen : सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
धार्मिक स्थळं उघडण्याचा घेऊन सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या निर्णयावर दिली.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. मात्र मंदिर खुली झाली तरी कोरोनासंदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करणे भाविकांना बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं. अखेर आठ महिन्यांनी भाविकांना
सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण
राज्य सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. मंदिरं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु आजच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी योग्यवेळी निर्णय घेतला- जयंत पाटील राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी दिवाळीच्या मंगलदिनी हा निर्णय घेतला आहे. तरीही भाजपचे नेते का ओरड करत आहेत माहिती नाही. भाविकांना मंदिरं खुली झाली तरी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यांची खबरदारी घ्यावी- अरविंद सावंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं मी मनापासून अभिनंदन करतो. आम्ही सातत्याने सांगते होतो धीर धरा. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं उघडी होत आहेत, त्यामुळे आता जबाबदारी आपली आहे. कोरोना संदर्भातले सर्व नियम भाविकांनी पाळले पाहिजेत. आपल्यामुळे परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाणार नाही यांची काळजी आपण घेतली पाहिजे.उशिरा का होईना पण चांगला निर्णय : इम्तियाज जलील
उशिरा का होईना पण सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. आम्ही दोन महिन्यांपूर्वी यासाठी आंदोलन केलं होतं. मंदिरं, प्रार्थनास्थळं बंद असल्याने अनेकांच्या व्यवसाय ठप्प झाले. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहेत. परंतु आता धार्मिक स्थळं उघडण्याचा घेऊन सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या निर्णयावर दिली.
सरकारच्या निर्णयाचं अभिनंदन : भाजप आध्यात्मिक आघाडी
उशिरा का होईना पण ठाकरे सरकारने निर्णय घेतला. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही अभिनंदन करतो. याचं श्रेय भाविकांच्या, साधुसंतांच्या आंदोलनाला जातं. नियमांचं अत्यंत काटेकोरपणे दर्शन घेतलं जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने दिली आहे.
अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर्वधर्मियांची ही मागणी होती. आम्ही समाधानी आहोत आणि सरकारला धन्यवाद देतो. मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे, असं मत महंत सुधीरदास यांनी सरकारच्या निर्णयावर व्यक्त केलं.
सोमवारपासून राज्यातली मंदिरं उघडणार! सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे सुरु करण्यास परवानगी