एक्स्प्लोर

Sushil Kumar Shinde : तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का? माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हिंदू दहशतवादवरून स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद शब्दावरून खुलासा केला, असला तरी विरोधकांकडून सातत्याने टीका होतच असते. आज सोलापूरमध्ये बोलताना पुन्हा एकदा त्यांनी या प्रकरणावरून भाष्य केले.

Sushil Kumar Shinde : जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी 'हिंदू दहशतवाद' या विषयावर वादग्रस्त विधान केले होते. काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणात शिंदे यांनी भगवा दहशतवादाचा उल्लेख केला होता. काही भगव्या संघटना दहशतवाद पसरवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे चालवत असल्याचे गृह मंत्रालयाच्या तपासात समोर आले आहे, असे ते म्हणाले होते. शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, 'तपासादरम्यान भाजप आणि आरएसएस दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवल्याचे वृत्त आले आहे. समझौता एक्स्प्रेस, मक्का मस्जिदमध्ये बॉम्ब पेरण्यात आले आणि मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले. याचा गांभीर्याने विचार करून सावध राहावे लागेल. शिंदे यांचे हे विधान त्यावेळी वादग्रस्त ठरले होते.

तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का?

तेव्हापासून सातत्याने सुशीलकुमार शिंदे यांनी खुलासा केला, असला तरी विरोधकांकडून सातत्याने टीका होतच असते. आज सोलापूरमध्ये बोलताना पुन्हा एकदा त्यांनी या प्रकरणावरून भाष्य केले. ते म्हणाले की, काही लोकांनी मी हिंदू दहशतवाद शब्द वापरला म्हणून माझ्यावर टीका केली. मी देशाचा गृहमंत्री होतो, जे रेकॉर्डवर आलं आहे ते सांगायचं नाही, तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का? या  माझ्याबरोबर बसा, मी तुम्हाला समजाऊन सांगतो, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. सोलापुरातील पद्मशाली समाज मेळाव्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदेनी वापरलेल्या हिंदू दहशतवाद शब्दावरून बराच वाद झाला होता. 

दरम्यान, शिंदे यांनी त्यांच्या 'फाइव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख करताना केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केलेले गोपनीय दस्तऐवज वाचून 'भगवा दहशतवाद' हा शब्दप्रयोग केला असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे प्रकरण भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्याशी संबंधित असल्याने त्यांनी जाहीरपणे बोलण्यापूर्वी आरोपांची सत्यता पडताळून पाहिली, असेही शिंदे म्हणाले. शिंदे त्यांच्या पुस्तकात लिहितात, 'माझ्या त्या काळातील मीडिया स्टेटमेंट्स कोणी पाहिलं तर त्यांना दिसेल की मी 'भगवा दहशतवाद' हा शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरला होता.'

इतर महत्वाच्या बातम्या 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget