एक्स्प्लोर
Siddheshwar Temple Solapur : ग्रामदैवत श्री.सिद्धरामेश्वर यांच्या योग समाधीला फुलांची आकर्षक सजावट, भक्तांची अलोट गर्दी
Siddheshwar Temple : सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर यांच्या योग समाधीला आज फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळालीय.

Siddheshwar Temple Solapur
1/10

देशभरात श्रावण (Shravan 2024) महिन्याच्या निमित्याने नवं चैतन्य, उत्साह आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.
2/10

दरम्यान आज श्रावण (Shravan 2024) महिन्याचा चौथ्या श्रावण सोमवार आहे.
3/10

या निमित्याने देशभरातील मंदिर शिवभक्तांनी फुललेली आहे.
4/10

अशातच, सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर यांच्या योग समाधीला आज फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
5/10

श्रावण सोमवार निमित्त घातलेल्या पूजेची ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य खास 'एबीपी माझा' च्या प्रेक्षकांसाठी चेतन लिगाडे यांनी आपल्या ड्रोनमध्ये टिपली आहेत.
6/10

श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळालीय.
7/10

अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणेच सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे मंदिर तलावाच्या मधोमध स्थित आहे.
8/10

सिद्धरामेश्वर यांच्या या मंदिराचे मनोहर दृश्य टिपलेय सोलापुरातील छायाचित्रकार चेतन लिगाडे यांनी.
9/10

राज्यात एकीकडे दहीहंडीचा उत्साह साजरा होत असताना आज राज्यातील मंदिरे ही आकर्षकरित्या सजली आहे.
10/10

सिद्धरामेश्वर यांच्या या मंदिराचे मनोहर दृश्य बघण्यासाठी आणि दर्शनासाठी सोलापूरकरसह राज्याच्या काण्या-कोपऱ्यातून भक्तांनी गर्दी केली आहे.
Published at : 27 Aug 2024 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion