एक्स्प्लोर
पंढरीत भक्ती अन् देशभक्तीचा संगम; तिरंग्यात नटलेल्या उजनी धरणाचंही मनमोहक दृश्य
भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तांसावर येऊन पोहोचला असून यंदा गुरुवारी 15 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात तिरंगा फडकला जाणार आहे.
Ujani dam in tricolor and pandharpur mandir tricolor
1/8

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तांसावर येऊन पोहोचला असून यंदा गुरुवारी 15 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात तिरंगा फडकला जाणार आहे.
2/8

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लाल किल्ल्यावर सकाळी 8 वाजता झेंडावंदन होईल, त्यानंतर देशभरातील शाळा, विद्यालये, संस्था आणि सरकारी आस्थापनांमध्ये ध्वजारोहन करण्यात येईल.
3/8

स्वातंत्र्य दिनाची सर्वत्र तयारी सुरू असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र देशभक्तीचा माहोल आहे. तिरंग्यांध्ये कार्यालयाची सजावट करुन, तिरंगा झेंडा लावून आस्थापना सजवल्या जात आहेत.
4/8

यंदा पाऊसकाळ झाल्याने राज्यातील बहुमतांश धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यातच, काही धरणांतून विसर्गही सुरु झाला आहे. धरणे भरल्याने नागरिकांनाही आनंद झाला आहे. आता, या धरणांवर तिंरगा दिसून येत आहे.
5/8

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 100% भरलेल्या उजनी धरणालाही तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली आहे. धरणावर तीन रंगाच्या लाईटमधून तिरंगी सलामी देण्यात आल्याचे मनमोहक दश्य डोळ्यात साठवण्यासारखं आहे.
6/8

धरणातून सुटणाऱ्या पाण्यावर भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगांची लायटींग, रात्रीच्या काळोख्यात स्वातंत्र्य दिनाची पहाट उजाडावी, अशीच मनमोहक दिसून येते.
7/8

अवघ्या विश्वाचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचे विठ्ठल मंदिरही तिरंग्यातील सजावटीने उजळून निघाले आहे.
8/8

येथील विठ्ठल मंदिरावरही तीन रंगात सजावट केल्याचे पाहून भक्ती अन् देशभक्तीचा संगमच पंढरपुरात पाहायला मिळतोय.
Published at : 13 Aug 2024 08:10 PM (IST)
आणखी पाहा























