एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha Election : सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात मतदान व मतमोजणीमधील आकडेवारीत तफावत

Maharashtra Vidhansabha Election : राज्यातील विविध मतदार संघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएममध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या मतमोजणीचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला. त्या अनुषंगाने राज्यातील विविध मतदार संघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएममध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 244-करमाळा, 245- माढा, 249—सोलापूर शहर मध्य, 251- सोलापूर दक्षिण या मतदार संघामध्ये मतदान व मतमोजणी मधील आकडेवारीत तफावत दिसून आली. त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे.

244- करमाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 29 हजार 375 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 29 हजार 377 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची वाढ ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.115 यांनी नमूना 17 सी मध्ये मतांचा हिशोब लिहिताना चुकीची नोंद घेतल्याने झाली. सदरची मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.

245-माढा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 67 हजार 691 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 67 हजार 21 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 670 मताची घट आढळून आली. सदरील बाब ही केंद्र क्र.149 केंद्राध्यक्ष यांनी मॉकपोल वेळी नोंदवलेली मते CRC न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे हस्त पुस्तिकामधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवाराची मतांची तफावत ही सदर केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतापेक्षा अधिक असल्यामुळे सदर केंद्राची 670 मते मतमोजणी दिवशी मोजली नाहीत त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.

249-सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 291 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 289 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची घट आढळून आली. सदरील बाब ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.197 यांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये 2 प्रदत्त मते ईव्हीएम मतांच्या हिशोबात गृहीत धरल्याने 665 मते नमुद केली तथापि मततोजणीच्या दिवशीच्या ईव्हीएम मध्ये 663 मते आढळून आली. सदरील मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.

251-सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 23 हजार 624 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 23 हजार 625 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 1 मताची वाढ दिसून आली. सदरील बाब केंद्राध्यक्ष यांनी 1 ईलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट चे मत गृहीत न धरल्यामुळे 676 मते असा हिशोब केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये नमुद केला. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मध्ये 677 मते आढळून आले. सदरील मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | 05 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 05 Jan 2025 | ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 05 Jan 2025 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी :  05 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
Embed widget