राज ठाकरेंचे राजकारण द्वेषाचं! ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचीच ताकद कमी होणार, अबू आझमींचा दावा
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले तर आम्हालाही आनंद होईल असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलं आहे.

Solapur : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले तर आम्हालाही आनंद होईल असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलं आहे. राज ठाकरेंची काहीही ताकद नाही, ते फक्त द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोपपही आझमी यांनी केला. राज ठाकरे हे दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलतात. मराठी आणि हिंदी विरोधात बोलणे हाच त्यांचा धंदा असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेनेचीच ताकद कमी होऊ शकते, असा दावा आबू आझमी यांनी केला आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषा असली पाहिजे
संसदेत भाषेच्या संदर्भात एक कमिटी आहे. यामध्ये 45 मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात, अस आझमी म्हणाले. केंद्र सरकारचे सगळं काम हे हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे असे आझमी म्हणाले. महाराष्ट्र जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे असेही आझमी म्हणाले.
मराठीचा सन्मान झाला पाहिजे
बाळा नांदगावकर हे जनतेची दिशाभूल करत असल्याची आझमी म्हणाले. मनसेचे 14 आमदार आले होते आता ते झिरो झाले आहेत. माझे शिक्षण इथे झाले नाही तरी मी मराठीसाठी प्रयत्न करतो. तरीपण मी मराठीची इज्जत करतो असे आझमी म्हणाले. मराठीचा सन्मान झाला पाहिजे पण हिंदीचा अपमान झाला नाही पाहिजे असेही आझमी म्हणाले. शरद पवार एक मोठे नेते आहेत. शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ती फक्त ईडी आणि इन्कम टॅक्स यांच्यामुळे सोडली आहे..
महाराष्ट्रत राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे असे आझमी म्हणाले.
आताच सरकार आहे ते फक्त निवडणुका जिंकण्यापुरते काम करणार
अमेरिकेने इराण हल्ला केला आहे. आम्हालाही वाटतं की इराणला पाठिंबा दिला पाहिजे असे आझमी म्हणाले.आताच सरकार आहे ते फक्त निवडणुका जिंकण्यापुरते काम करत आहे. ज्या मोठं मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोग आता यांच्या हातातील खेळण झाल्याचे आझमी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Chandrashekhar Bawankule: अबू आझमींनी मुजोरी करू नये, ईदला आमचा विरोध नाही, पण...; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा
























