एक्स्प्लोर

Solapur Crime News: एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, त्रासाला कंटाळून दामपत्याने संपवलं जीवन, सोलापूर हादरलं, नेमकं प्रकरण काय?

Solapur Crime News: एकतर्फी प्रेमातून पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून सोलापुरात एका दामपत्याने आत्महत्या केली.

Solapur Crime News: एकतर्फी प्रेमातून पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून सोलापुरात एका दामपत्याने आत्महत्या (Solapur Crime News) केली. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केलीय. काल सकाळी सोलापुरातील कलावती नगर भागात राहणाऱ्या सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील दामपत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले होते. (Solapur Crime News)

दामपत्याने आत्महत्या केली की हत्या असा संशय काल निर्माण झाला होता. मात्र या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिट्ठीमुळे दोघांच्या मृत्युचे कारण समोर आलं आहे. याप्रकरणतील आरोपी अभिषेक कोरे हा श्रीदेवी पाटील यांना फोनवरून वारंवार त्रास देत होता. तुझी बदनामी करेन अशी धमकी देत होता. या धमकी आणि बदनामीला कंटाळून श्रीदेवी आणि सोमनाथ पाटील या दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीच्या आधारे संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. (Solapur Crime News)

नेमकं प्रकरण काय? (Solapur Crime News)

काल सोलापूर शहरात धक्कादायक घटना समोर आली होती. शहरातील कलावती नगरात राहत्या घरी पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले होते. दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला होता. सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृत आढळलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. घरात पती-पत्नीसह दोन मुलीही होत्या मात्र सकाळी आई वडील झोपेतून उठत नसल्याचे कळताच मुलींनी काकांना फोन करुन ही घटना सांगितली. त्यानंतर दोघांनाही शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान दोघांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीच्या आधारे संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापुरात घरफोडी करणाऱ्या पुण्याच्या सराईत आरोपीला अटक- (Solapur Crime News)

सोलापूर शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत पुण्याच्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून एकूण पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत तब्बल 3 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किसन महादेव व्हनकोरे असे आहे. त्याच्याकडून 51 ग्रॅम सोने व 82 तोळे चांदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाणे हद्दीत दिवसा घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी किसन व्हनकोरेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सोलापूर शहरात एकूण पाच घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यापैकी चार गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत केल्याचे त्याने सांगितले. या पाचही गुन्ह्यांचा छडा लावत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातम्या:

Badlapur Uterine Eggs Selling Racket: 12 वेळा महिलेकडून स्त्री बीज काढलं, 18 ते 25 हजार रुपये, मुख्य केंद्र ठाणे-नाशिक, बदलापूरमधील स्त्री बीज विक्री प्रकरणात धक्कादायक खुलासे

Badlapur IVF Racket : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण, पोलिसांची मोठी छापेमारी, घरगुती IVF केंद्रातून 8 लाखांचा इंजेक्शन औषधसाठा जप्त

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget