Chandrashekhar Bawankule: अबू आझमींनी मुजोरी करू नये, ईदला आमचा विरोध नाही, पण...; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा
Chandrashekhar Bawankule : गोवंशाची हत्या करण्याचा प्रयत्न केला, अथवा त्यासंदर्भात बळजबरी केली, तर आमचं सरकार कारवाई करेल. असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

Chandrashekhar Bawankule नागपूर : अबू आजमी काय बोलले मला माहित नाही, मात्र अबू आजमी यांनी असे बोलू नये. समाजात तेढ निर्माण करू नये. महाराष्ट्रात गोहत्या प्रतिबंध कायदा लागू आहे आणि तो कायदा लागू असताना गोवंश कत्तल करणे हे योग्य नाही. आमचं सरकार गोवंशची हत्या होऊ देणार नाही. कोणी यासंदर्भात गोवंशाची हत्या करण्याचा प्रयत्न केला, अथवा त्यासंदर्भात बळजबरी केली, तर आमचं सरकार कारवाई करेल. असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे.
गाईचे लहान वासरू कापण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत आहे, असं झाल्यास आम्ही आणखी कठोर कारवाई करू. महाराष्ट्रात गोवंश कापला जाणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ. अबू आजमीने (Abu Azmi)अशी मुजोरी करू नये. ईदला आमचा विरोध नाही, ती साजरी केली पाहिजे. मात्र गोवंशची हत्या करून ती साजरी होऊ नये. असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
नितेश राणे काय बोलले, मला माहित नाही. प्रत्येक धर्माला आपला सण साजरा करण्याचा अधिकार आहे. मात्र गोहत्या करणे या राज्यामध्ये आम्हाला मंजूर नाही.असेही ते म्हणाले.
गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे गोसेवा आयोगाचे पत्र मागे, रईस शेख यांच्या मागणीला यश
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 8 जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात राज्य गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलेले वादग्रस्त पत्र मागे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.
यासंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सह्याद्री अतिथीगृह येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थे संदर्भात मुख्यमंत्री फडणीस यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या या बैठकीतही आमदार शेख यांनी ते पत्र मागे घेण्यासंदर्भात आग्रह धरला होता. यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, 7 जून रोजी बकरी ईद सण देशभर साजरा होत आहे. राज्यात गोवंश हत्याना कायद्यानुसार बंदी आहे. मात्र गोवंश हत्त्येच्या नावाखाली राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे 27 मे रोजी पत्राद्वारे बेकायदा आदेश दिले होते. यामुळे ईदच्या कुर्बानीला बकरी मिळणे मुश्किल झाले होते. म्हणून मुस्लिम समाजामध्ये त्या पत्रासंदर्भात नाराजी होती.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या लक्षात हे पत्र आणून दिल्यानंतर गोसेवा आयोगाचे पत्र मागे घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोवंशाच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात, हप्ते घेतात, वाहन चालकांना मारहाण करतात. अशी बेकायदेशीर कामे करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करावा, अशी विनंती आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली.
मुंबईतील देवनार कत्तलखान्यातील कत्तलचे वाढवलेले शुल्क वर्षभरासाठी 20 रुपये करण्यात यावे. देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करावे आणि मुंबईत मांस मार्केट हे पूर्व, पश्चिम आणि उपनगर असे विकेंद्रीत पद्धतीने करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केल्याचे आमदार रईस शेख यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या


















