एक्स्प्लोर

Solapur Crime News: आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्..., सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

Solapur Crime News: दोघांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी त्याबाबत दुजोरा दिलेला नाही. एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सोलापूर : सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील कलावती नगरात राहत्या घरी पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पती पत्नी दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने ही आत्महत्या (Solapur Crime News) आहे की घातपात याबाबत संशय (Solapur Crime News) निर्माण झाला आहे. सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृत आढळलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घरात पती-पत्नीसह दोन मुलीही होत्या, मात्र सकाळी आई वडील झोपेतून उठत नसल्याचे कळताच मुलींनी काकांना फोन करुन ही घटना सांगितली. त्यानंतर दोघांनाही शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान दोघांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी (Solapur Crime News) सापडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी त्याबाबत दुजोरा दिलेला नाही. एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.(Solapur Crime News)

तोंडातून फेस येत असल्याचे त्यांच्या मुलींनी पाहिले

मृत सोमनाथ आणि श्रीदेवी यांना दहा वर्षाची धनश्री व सहा वर्षाची देवयानी अशा दोन मुली आहेत. शुक्रवारी (दि.२७) सकाळी सहाच्या सुमारास सोमनाथ आणि श्रीदेवी हे दोघे घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांच्या मुलींनी पाहिले. ते पाहताच त्यांनी घाबरून लगेच आपल्या काकांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांचे काका नागनाथ हे घटनास्थळी आले. त्यांनी दोघांना लगेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सोमनाथ पाटील यांचा पूर्वी शेळीपालनाचा व्यवसाय होता नंतर त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते. शवविच्छेद‌नानंतर दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.(Solapur Crime News)

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून काही वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांची तपासणी केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे कलावती नगर परिसरात शोककळा पसरली असून दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलीस विविध अंगांनी तपास करत असून आत्महत्या की घातपात, याबाबत सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.(Solapur Crime News)

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ! सरचिटणीसपदी ABP माझाचे आफताब शेख, तर अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे बिनविरोध
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ! सरचिटणीसपदी ABP माझाचे आफताब शेख, तर अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे बिनविरोध
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget