एक्स्प्लोर
विनायक मेटेंचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
नवीन सरकारमधील मुख्यमंत्री, त्यांचा कुणीही मंत्री या स्मारकासाठी कोणतीही आढावा बैठक करत नसल्याचं कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. लवकर याबाबतच काम व्हावं असं माझं म्हणणं आहे, असं मेटे म्हणाले.
मुंबई : शिवसंग्रामचे नेतेविनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समन्वय समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर बोलताना मेटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समन्वय समितीचा अध्यक्षपदाचा मी राजीनामा दिला आहे. कारण हे सरकार आल्यानंतर अडीच तीन महिने झाले तरी मुख्यमंत्री किंवा त्यांचा कुणीही मंत्री या स्मारकासाठी कोणतेही आढावा बैठक करत नाही किंवा आढावा घ्यावा असा वाटत नाही, असं मेटे म्हणाले.
ते म्हणाले की, अनेक केसेस या विरोधात सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात, हरित लवादाकडे आहेत. या केसेस गुंतागुंतीच्या आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे, पण लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे या सरकारला ही समिती हवी की नको? माझा अडथळा त्यांना होतोय का? माझी अडचण तर नाही ना, म्हणून मी माझा राजीनामा दिला आहे. आता मी बाजूला झालो आहे आता तरी लवकर याबाबतच काम व्हावं असं माझं म्हणणं आहे, असं मेटे म्हणाले.
त्यांनी सांगितलं की, जसं काम सुरू होत आहे, तसं नवीन नवीन मुद्दे येत आहेत. प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे, त्यामुळे आता हे अडथळे येत आहेत. आता या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विचाराने वाटेल तसं हे काम सुरू करावं, असंही मेटे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सगळ्या परवानग्या मिळाल्या. त्यामुळे त्यांना दोष देणं चुकीचे आहे, असंही मेटे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी बोलताना ते म्हणाले की, जयंतीविषयी जे वाद होते त्याविषयी मागच्या काळात महाराष्ट्र शासनाने समिती बसवून सर्वानुमते 19 फेब्रूवारी हीच तारीख जाहीर केली आहे. तेव्हा युतीचं सरकार होतं. शिवसेना ही तारीख मान्य करायला तयार नाही. आता प्रश्न असा आहे की शासनाचाच निर्णय असल्याने शिवनेरीला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून जावंच लागेल. शिवसेनेने सुद्धा पुर्वीचा बालहट्ट सोडून द्यावा आणि एकच 19 तारीख ठरवावी, नाहीतर त्यांचा दुपट्टीपणा समोर येईल, असं मेटे म्हणाले.
मेटे म्हणाले की, महाराजांच्या नावावर तरी आम्ही दुटप्पी वागणार नाही, हे दाखवायची त्यांना आता संधी आहे. आमची शिवसंग्रामची मागणी आहे की शिवसेनेने हट्ट सोडून 19 तारखेलाच जयंती साजरी करावी. आज ते स्वतः मुख्यमंत्री असल्याने त्यांना त्यांचा हट्ट सोडावाच लागेल. लोकांना दुटप्पी मुख्यमंत्री भावणार नाही, असं ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement