एक्स्प्लोर

अरबी समुद्रातील शिवस्मारकात एक हजार कोटींचा भ्रष्टाचार : काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमासाठी नाही तर सुरुवातीपासूनच पैसे खाण्यासाठी होता हे स्पष्ट झाले असून शिवस्मारक प्रकल्पातील भ्रष्टाचाराची कार्यपद्धती अत्यंत किळसवाणी आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार असून त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टाकडे दाद मागणार आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतयांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
हा सर्व भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने झाल्याचा आरोप करतानाच त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.  मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत सरकारने घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याचा पार्ट -2 येतोय असं सांगितलं होतं.  आज या संदर्भात कागदपत्रं नवाब मलिक आणि सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.
एल & टी या कंपनीने भरलेल्या 3 हजार 800 कोटी रूपयांच्या निविदेची रक्कम वाटाघाटीद्वारे 2 हजार 500 कोटी रूपयांपर्यंत कमी करण्याला विभागीय लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदवत चौकशीची मागणी केली होती. यातील गंभीर बाब ही आहे की, या प्रकल्पाची निविदेतील किंमत 2 हजार 692.50 कोटी होती. पंरतु एल & टी कंपनीची निविदेतील बोली ही 3 हजार 826 कोटी म्हणजेच जवळपास 42 टक्के अधिक होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रकल्पाची फेरनिविदा होणे आवश्यक होते. आराखडा बदलून ही रक्कम अंदाजीत रकमेच्या एक हजार कोटींपेक्षाही कमी झाली आहे. परंतु एल & टी ने आधीच फुगवलेली रक्कम आम्ही वाटाघाटीतून कमी केली आणि शासनाचा फायदा करून दिला असे सरकारकडून भासवले जात आहे. परंतु वस्तुतः यात एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम काढण्याचा सरकारचा हा डिझाईन करुन भ्रष्टाचार करण्याचा डाव होता असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
दोन लिगल ओपिनियनमध्ये शब्द ना शब्द एकच आहे. म्हणजे सुरुवातीपासून ठरवून एल अ‍ॅण्ड टी ला टेंडर द्यायचे ठरले होते असा थेट आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भ्रष्टाचार झाल्याचे पत्र दिले आहे. शिवाय कॅगचे अधिकारी सांगत आहेत की मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार झाला आहे. मात्र यामध्ये इतर पक्षांसह शिवसेनाही गप्प आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमासाठी नाही तर सुरुवातीपासूनच पैसे खाण्यासाठी होता हे स्पष्ट झाले असून शिवस्मारक प्रकल्पातील भ्रष्टाचाराची कार्यपद्धती अत्यंत किळसवाणी आहे. शिवस्मारकाच्या कामात एक हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचे सरकारचे कारस्थान आहे.  महाराष्ट्राच्या 59 वर्षांच्या राजकीय परंपरेला कलंकीत करणारे हे कृत्य असून राज्यातील शिवप्रेमी जनता भाजप शिवसेना सरकाला कदापी माफ करणार नाही, अशी  टीका सचिन सावंत यांनी  केली.
यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती. दिनांक 9 फेब्रुवारी 2018 च्या बैठकीत याबाबत झालेल्या चर्चेत शासनाला यासंदर्भात वाटाघाटी कराव्यात की नाही याकरिता विधी व न्याय विभागाचा किंवा महाधिवक्ता यांचा सल्ला घेणे अपेक्षित होते. परंतु अचंबित करणारी बाब ही आहे की, मे. एजीस इंडिया प्रा. लि. या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने या निविदेसंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी स्वतः च एका प्रख्यात विधी सल्लागाराची नेमणूक केली. या अनुषंगाने माजी एटर्नी जनरल मुकुल रोहतगी आणि निवृत्त न्यायाधीश व्ही. एन. खरे यांचा सल्ला सदर मे. एजीस इंडिया प्रा. लि. यांनी घेतला या दोन्ही विधी सल्लागारांच्या अहवालाचा अभ्यास केला असता दोन्ही अहवाल शब्दश: सारखेच असून प्रथमदर्शी हे दोन्ही अहवाल एकाच व्यक्तीने तयार केले आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते, असेही सावंत म्हणाले. विनायक मेटे यांनी 15 सप्टेंबर 2018 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यामधील भ्रष्टाचार निदर्शनास आणून प्रयत्न केला होता. या संदर्भात विनायक मेटे यांनी स्वतःच्या पत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच करारनामा करताना स्मारकाच्या कामात काही महत्त्वपूर्ण बाबी मुद्दामहून वगळण्यात आल्या आहेत. करारनामा आणि कार्यारंभ आदेश देण्याकरिता मंत्रालयीन पातळीवरून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकून करारनामा व कार्यारंभ आदेशावर सह्या घेण्यात आल्या आणि एकाच वेळी देण्यात येणारा कार्यारंभ आदेश तीन तीन वेळा देण्याचा चमत्कार केला असा आरोप करून चौकशीची मागणी केली होती, असेही त्यांनी सांगितले.
 एवढी गंभीर बाब समोर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश देणे अपेक्षित होते परंतु अद्यापही या प्रकाराची चौकशी न होणे यातच सरकाराचा या घोटाळयात सहभाग हे स्पष्ट करणारे आहे. ज्या 80 कोटी रूपयांची मोबीलायझेशन अॅडवान्स म्हणून एल & टी कंपनीला पैसे देण्याची सरकारला घाई झाली आहे, ती पद्धत महाराष्ट्रात कुठेही प्रचलित नाही. या पद्धतीचा अवलंब केवळ या कंपनीला काहीच काम न करता लाभ मिळवून देण्याकरिता आहे, असे विनायक मेटे यांनी स्वतःच आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध होतात. महाराजांच्या स्मारकातही पैसे खाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असे सावंत आणि मलिक म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंना सांगितला इतिहास, विधानसभा अध्यक्षांची भेट
दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंनी सांगितला इतिहास, अध्यक्षांना भेटले
Ladki Bahin Yojana E-KYC : नोव्हेंबरच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत, एकल महिलांबाबत मोठा निर्णय
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंना सांगितला इतिहास, विधानसभा अध्यक्षांची भेट
दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंनी सांगितला इतिहास, अध्यक्षांना भेटले
Ladki Bahin Yojana E-KYC : नोव्हेंबरच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत, एकल महिलांबाबत मोठा निर्णय
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Embed widget