एक्स्प्लोर
Advertisement
सर्वात ज्येष्ठ मीच, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माझाच हक्क : विनायक मेटे
भाजपसोबतचे घटकपक्ष आणि भाजप आमदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी असल्यानं विरोधी पक्षनेतेपदावर माझाच अधिकार आहे, असं वक्तव्य मेटेंनी केलंय.
बीड : भाजपा आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात ज्येष्ठ मीच आहे. त्यांच्यात अनुभवीसुद्धा मीच आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे असं वक्तव्य शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी केलं आहे. विनायक मेटे यांच्या दाव्याने आता भाजपच्या अडचणीत वाढ होणार आहे.
“विधानपरिषद विरोधीपक्षनेतेपदाबद्दल बोलायचं झाल्यास हा सर्वस्वी निर्णय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांसारख्या पक्ष श्रेष्ठींचा आहे. मात्र एक बाब निश्चितपणे सांगतो, विधानपरिषदेत भाजप आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात जेष्ठ मीच आहे. अनुभवी मीच आहे. त्या अर्थाने विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे, असं म्हणतं हा सर्वस्वी निर्णय भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीचा आहे,” असा दावा विनायक मेटे यांनी केला आहे.
तसेचं विरोधीपक्षामध्ये राहून आम्ही सकारात्मक विरोधीपक्षाचं काम आम्ही करु. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालं आहे. आता हे सरकार काय निर्णय घेतं?, लोकोपयोगी काय निर्णय घेतात की नाही?, शेतकरी, महिला यांच्यासाठी काय निर्णय घेतला जातो? हे आम्ही पाहू. जर समजा या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही तर, आम्ही विरोधाचं काम चोखपणे बजावण्याचं काम करु असं मतं विनायक मेटे यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापने नंतर आम्ही विरोधी पक्षात आहोत. ते काम आम्ही चोखपणे बजावणार आहोत यासाठी शिवसंग्रामच्या सर्व आमदारांना घेवून मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. तसेच चवदार तळ्यावर जावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून प्रेरणा घेवून संघर्षाला सुरुवात करणार असल्याचं आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. भाजपचे विधिमंडळ गटनेते असलेल्या फडणवीस यांचेच नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी आल्याने त्यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेते म्ह्णून करण्यात आली.
Devendra Fadnavis | विरोधी पक्षाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंचं केलं अभिनंदन | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement