(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाचगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा, सलग तिसऱ्यांदा स्वच्छ भारत मिशन अभियानात अव्वल
Swachh Bharat Abhiyan : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात एक लाखापेक्षा कमी असलेल्या लोकसंख्येची स्वच्छ नगरपालिका म्हणून पहिला क्रमांक देण्यात आला आहे.
सातारा : महाराष्ट्रातील पाचगणीने (Pachgani) स्वच्छतेसाठीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकावला आहे पाचगणीची सलग तिसऱ्यांदा सर्वेक्षण विभागाने निवड केली आहे. यंदाच्या स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Abhiyan) अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात पाचगणीने अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे पाचगणीचा नावलौकिक वाढला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील पाचगणी हे एक थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरबरोबर (Mahableshwar) पर्यटक हे पाचगणीला भेट देतात. पाचगणीची सलग तिसऱ्यांदा सर्वेक्षण विभागाने निवड केलीय. यंदाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात पाचगणीने अव्वल स्थान मिळवले आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात एक लाखापेक्षा कमी असलेल्या लोकसंख्येची स्वच्छ नगरपालिका म्हणून पहिला क्रमांक देण्यात आला आहे. पुरस्कार मिळताच पाचगणीत एकच उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
या पुरस्कारचे खरे मानकरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि या मिशनचे ब्रॅन्ड अम्बेसिडर चित्रपट निर्माती आणि लगन चित्रपटातील कलाकार हमिन हाजी आहे. बारा महिने बोचरी थंडी असलेल्या या पाचगणीमध्ये बाराही महिने पर्यटकांची रेलचेल असते. त्यात या ठिकाणचा टेबल लॅन्ड हा प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील दोन नंबरचा टेबल लॅन्ड म्हणून ज्याची नोंद आहे तेही याच पाचगणीमध्ये आहे. त्यात अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील येथे राहतात. शिवाय अनेक दिग्गजांचे हे आवडते ठिकाण म्हणून ओळखले जाते. विविध बाजूने या पाचगणीची ख्याती आहे आणि याच पाचगणीच्या नगरपालिकेने सर्वांना हाताशी धरुन या पाचगणीचा कायापालट केला.
रस्त्यावर कोठेच कचरा दिसणार नाही याची काळजी बाराही महिने घेतली जाते आणि याचे फळ पाचगणीचा मिळाले. एक लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात यांना सलग तीसऱ्या वर्षी पहिला क्रमांक मिळाला आहे.
इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर
गांधी जयंतीच्या निमित्ताने आज 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात इंदूरला (Indore) सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून बाजी मारली आहे. तर सुरत आणि नवी मुंबईने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यांचा विचार करता मध्य प्रदेशने पहिला क्रमांक पटकावला असून छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंदूर आणि सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या श्रेणीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विजयवाडाची घसरण झाली आहे.
संबंधित बातम्या :
Swachh Survekshan Awards 2022 Indore Deemed Cleanest City For 6th Time In A Row | Swachh Survekshan Awards: इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर, राज्यांमध्ये मध्य प्रदेशची बाजी