एक्स्प्लोर

Sangli Loksabha : सांगलीत एकाच मतदान केंद्रावर चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याचा संशय

Sangli Loksabha : मतदानासाठी चार महिला मतदान करण्यासाठी मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. परंतु, यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.

सांगली : सांगलीत लोकसभा (Sangli Loksabha) मतदानावेळी बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मतदानादिवशी सांगली शहरातील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची तक्रार निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संबंधित महिलांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला. 

वाचा : Sangli Loksabha : सांगलीत 3 पाटलांमध्ये तिरंगी लढत, कोण बाजी मारणार? माझा अंदाज

मतदानासाठी चार महिला मतदान करण्यासाठी मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. परंतु, यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु, संबंधित महिलेनं आम्ही मतदान केलंच नाही, तर कोणी आमच्या नावावर मतदान केलं? असा जाब विचारला. परंतु, तुमच्या नावावर मतदान झालं असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असं केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर संबंधित महिलांनी गोंधळ घातला. मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये आणि पोलिसामध्ये झटापटीचा प्रकार घडला. आता याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

सांगलीत 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात घट

दुसरीकडे, सांगली लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात घट झाली आहे. सांगली लोकसभेसाठी 58 टक्के मतदानाची नोंद झाली. 2019 मध्ये 55.78 टक्के मतदान झाले होते. उन्हाचाही परिणाम मतांवर झाल्याचे दिसून आलं आहे. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 2,448 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.  त्यापैकी 1,224 केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात आली.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सर्वाधिक 61.16 टक्के मतदान

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सर्वाधिक 61.16 टक्के मतदान झाले. खानापूर मतदारसंघात सर्वात कमी 51.11 टक्के मतदान झाले. सांगली लोकसभेत भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. 2019 मध्ये भाजपचे संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांचा 1.60 लाख मतांनी पराभव करून निवडणूक जिंकली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
Sangli Crime News: साक्षीदाराला जबाब देण्याआधीच पळवलं; कर्नाटकात नेऊन संपवलं, त्यानेच जीवन संपवल्याचा बनाव रचला, पोलिसांची चक्र फिरली अन् शिवसेना शहरप्रमुखासह तीन ताब्यात
साक्षीदाराला जबाब देण्याआधीच पळवलं; कर्नाटकात नेऊन संपवलं, त्यानेच जीवन संपवल्याचा बनाव रचला, पोलिसांची चक्र फिरली अन् शिवसेना शहरप्रमुखासह तीन ताब्यात
Sangli Crime News: दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराला जबाब देण्याआधीच पळवलं; पेट्रोल भरायला गेले अन् तिथून...; सांगलीतील घटनेनं खळबळ
दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराला जबाब देण्याआधीच पळवलं; पेट्रोल भरायला गेले अन् तिथून...; सांगलीतील घटनेनं खळबळ
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका

व्हिडीओ

Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report
Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई
Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
सुनेत्रा पवारांनी तटकरे अन् पटेलांना मेसेज दिल्याची चर्चा असतानाच तटकरे साहेबांच्या भेटीला, रोहित पवारांचाही मोठा दावा; राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवार आज काय काय बोलणार?
सुनेत्रा पवारांनी तटकरे अन् पटेलांना मेसेज दिल्याची चर्चा असतानाच तटकरे साहेबांच्या भेटीला, रोहित पवारांचाही मोठा दावा; राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवार आज काय काय बोलणार?
Nagpur News: गाजावाजा करून भूमिपूजन, वर्ष लोटलं तरी काम अर्धवट, आमदार मेघेंनी उरकलेलं ‘ते’ कार्य फक्त निवडणुकीसाठीच? बेजबाबदार कंत्राटदार अन् नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
गाजावाजा करून भूमिपूजन, वर्ष लोटलं तरी काम अर्धवट, आमदार मेघेंनी उरकलेलं ‘ते’ कार्य फक्त निवडणुकीसाठीच? बेजबाबदार कंत्राटदार अन् नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
'22 वर्षांपासून राजकारणात, 54 दौऱ्यांवर 60 कोटींचा खर्च, यांना निधी कोण पुरवतंय?' राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संबित पात्रांकडून प्रश्नांची सरबत्ती
'22 वर्षांपासून राजकारणात, 54 दौऱ्यांवर 60 कोटींचा खर्च, यांना निधी कोण पुरवतंय?' राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संबित पात्रांकडून प्रश्नांची सरबत्ती
Xi Jinping Meets Donald Trump: चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले
चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले
Trisha Krishnan Offer From Opposition Party: तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्विस्ट? थलपती विजय यांचे कट्टर विरोधक स्टॅलिन यांची तृषा कृष्णनला 12 कोटींची ऑफर
तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वीस्ट? थलपती विजय यांचे कट्टर विरोधक स्टॅलिन यांची तृषा कृष्णनला 12 कोटींची ऑफर
NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?
NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?
उत्तर प्रदेशात वादळाचा अक्षरशः हाहाकार; प्रयागराज आणि अयोध्येसह 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 94 जणांचा बळी; तरुण पत्र्याच्या शेडसकट हवेत उडाला; तिकडं राजस्थान, एमपीत भीषण गर्मीचा कहर
उत्तर प्रदेशात वादळाचा अक्षरशः हाहाकार; प्रयागराज आणि अयोध्येसह 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 94 जणांचा बळी; तरुण पत्र्याच्या शेडसकट हवेत उडाला; तिकडं राजस्थान, एमपीत भीषण गर्मीचा कहर
Embed widget