एक्स्प्लोर

Sangli Loksabha : सांगलीत वारं कोणत्या बाजूनं फिरलंय? तीन पाटलांमधील कोणते पाटील दिल्लीत जाणार??

Sangli Loksabha : सांगली लोकसभेमध्ये मिरज, सांगली, तासगाव कवठेमहांकाळ, जत, खानापूर, पलूस-कडेगाव या सहा विधानसभा मतदारसंघ मतदारसंघाचा समावेश होतो.

Sangli Loksabha : महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सर्वाधिक चर्चा झालेल्या आणि महाविकास आघाडी तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेल्या सांगलीमध्ये मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. शेजारच्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झालं आहे. सांगली लोकसभेसाठी 60 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद 

सांगली लोकसभेमध्ये मिरज, सांगली, तासगाव कवठेमहांकाळ, जत, खानापूर, पलूस-कडेगाव या सहा विधानसभा मतदारसंघ मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली. मिरजमध्ये 59 टक्के मतदानाची नोंद झाली. सांगलीमध्ये 57.50 टक्के मतदानाची नोंद झाली. तासगाव कवठेमहांकाळमध्ये 61.16 टक्के मतदानाची नोंद झाली. जतमध्ये 69.32 टक्के मतदानाची नोंद झाली. खानापूरमध्ये 51.11 टक्के मतदानाची नोंद झाली. पलूस कडेगावमध्ये 56.45 टक्के मतदानाची नोंद झाली. साधारणपणे 60 टक्क्यांच्या घरामध्ये सांगली लोकसभेसाठी मतदान झाले. यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. 

सांगलीमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटामधील संबंध विकोपाला गेले. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ठाकरे शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने सांगलीमध्ये तिरंगी लढत झाली. त्यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 

त्यामुळे चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार? याचे उत्तर चार जून रोजीच मिळणार आहे. दरम्यान सांगलीमध्ये किरकोळ वादाचे प्रकार ओळखा वगळता शांततेमध्ये मतदान पार पडले. सांगली लोकसभेमध्ये 1 हजार 830 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. संजय पाटील आणि  विशाल पाटील यांचे बूथ सर्वत्र दिसून आले. महिला पुरुषांसह तरुण, दिव्यांग मतदारांनी सुद्धा मतदानांमध्ये सहभाग घेत उत्साह वाढवला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget