एक्स्प्लोर

Sangli: सांगलीतील विलिंग्डन कॉलेजच्या सिक्युरिटी गार्ड्सकडून विद्यार्थ्यांना पाठलाग करुन बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Sangli Crime: मारहाण होताना काही विद्यार्थी त्या ठिकाणाहून पळून गेले तरी त्यांना त्यांच्या घरी जाऊन गार्ड्सनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. 

सांगली: शहरातील विलिंग्डन कॉलेजमध्ये सिक्युरिटी गार्डकडून (Sangli Willingdon College Security Guards) विनाकारण विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कॉलेजमध्ये मारहाण केल्यानंतर सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांच्या घरात जाऊन पुन्हा विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. यात विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार सिक्युरिटी गार्ड्सवर संजयनगर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sangli Willingdon College Security Guards: सांगलीतील मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Sangli Willingdon College Viral Video) झाला आहे. मात्र  विद्यार्थ्यांना ही बेदम मारहाण कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समजू शकले नाही.

सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमधील बीसीएसच्या दुसऱ्या वर्गाची परीक्षा झाल्यावर विद्यार्थी घरी जात असताना तिथल्या गाड्यांजवळ सेल्फी काढत होते. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना सिक्युरिटी गार्ड्सनी काठीने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर बेदम मारहाण केली. मारहाण होत असताना विद्यार्थी घाबरून घराकडे पळू लागले. तर सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन पुन्हा त्यांना जबर मारहाण केली. 

दोन ठिकाणी गुन्हा दाखल

या प्रकरणी संजयनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये चार सिक्युरिटी गार्ड्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलिंग्डन कॉलेजमध्ये अथर्व कदम या विद्यार्थ्याला सिक्युरिटी गार्डने जबर मारहाण केली.  सिक्युरिटी गार्डने पियुश दीपक जाधव आणि प्रणित या अठरा वर्षे वयाच्या मुलांना त्यांच्या घराजवळ जाऊन जबर मारहाण करून जखमी केले. याबाबत विलिंग्डन कॉलेजच्या सूरज सूर्यवंशी  आणि अन्य दोन सेक्युरिटी गार्ड्सविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

विद्यार्थ्यांना पाठलाग करून अमानुष मारहाण करणे, शिव्या देणे, धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे संजय नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे काही विद्यार्थ्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीने पालक वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहेत. विलिंग्डन महाविद्यालयाने या प्रकरणाचा तपास करुन संबंधित सिक्युरिटी गार्ड्सवर कारवाई करावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांच्या पालक वर्गातून केली जात आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Embed widget