एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला

Sambhajiraje Chhatrapati : समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठींबा देण्याचं काम केलं, असे अमित शाह म्हणाले होते.

संत रामदास त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे असतील, किंबहुना आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास तुम्ही जर जोडलं तर ते तसं होऊ शकत नाही  शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब आहेत, अशा शब्दात स्वराज्य पक्षप्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेला दावा खोडून काढला. शिराळ्यामध्ये अमित शाह यांनी केलेल्या दाव्यानंतर संभाजीराजे यांनी अत्यंत कडक शब्दात प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे म्हणाले की, त्यांचं (समर्थ रामदास) महत्त्व असेल तर ते त्या ठिकाणी असावे. त्यांच्या महत्त्वाला आम्ही काय चॅलेंज करत नाही. समर्थ रामदासांना शिवाजी महाराज सोबत जोडायचं हे बरोबर नाही आणि न पटणारे असल्याचे संभाजीराजे म्हणाले. शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब असल्याचे संभाजीराजे म्हणाले. 

शिराळामधील सभेत अमित शाह काय म्हणाले?

शिराळ्यामधील भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ बोलताना अमित शाह म्हणाले की, समर्थ रामदास यांचे पाय या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठींबा देण्याचं काम केलं. त्या समर्थ रामदासांना मी नमन करतो. यानंतर संभाजीराजे यांनी शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. 

शरद पवार याना निवडणुकीत तुम्हाला उत्तर द्यावे लागणार

दरम्यान, अमित शाह यांनी सांगलीमधील सभेत बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की,  सांगलीत लवकरच विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू, या विमानतळावर अनेक ठिकाणाहून लवकरच विमाने धावतील. सांगलीत वसंतदादाच्या नावाने आशिया खंडातील सर्वांत मोठा कारखाना होता, तो कारखाना शरद पवारांनी आणि काँग्रेसने सत्ता असताना विकण्याचा प्रयत्न केला. हळदीच्या व्यापारासाठी मजबूत केंद्र सांगलीत बनवू.  महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत असा शरद पवार, मविआ म्हणत आहे. दोन वर्षात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात होत आहे.  सांगलीत देखील लवकरच नवीन मोठा प्रोजेक्ट होणार असल्याचे सांगितले. शरद पवार यांना निवडणुकीत तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. उद्धव बाबू तुम्हाला आता मुख्यमंत्री बनवणार नाहीत, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका. छत्रपती संभाजी नगरला विरोध करणाऱ्या राम मंदिराला विरोध करणाऱ्या सोबत तुम्ही बसला आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तुम्ही सत्तेसाठी तिलांजली दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Weather Update : होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Beed Police  : गुंड खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना, खोक्याकडे सापडले 60 हजार रुपयेBuldhana Kailas Nagre News : सणाच्या दिवशीच सरकारच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं जीवन संपवलंBeed Crime Videos Specail Report : बीडमधील मारहाण प्रकरण, दहशत निर्माण करण्यासाठी VIDEO काढतातKhadakpurna Kailas Nagre News : शासनाकडून आवश्यक मदत मिळणार : माणिकराव कोकाटे कृषिमंत्री

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Weather Update : होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
RBI Repo Rate Cut: आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, सलग दुसऱ्या तिमाहीत रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Embed widget