Health Tips : एक आठवड्यासाठी साखर सोडून द्या ...शरीरात जाणवतील 'हे' सकारात्मक बदल
केवळ एक आठवड्यासाठी साखर खाणे बंद केले तर शरीरात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात.
Why Too Much Sugar Is Bad : साखर ही एक अशी गोष्ट ज्याचा वापर जवळपास प्रत्येक पदार्थात केला जातो. केमिकल कोटेड साखरेत मोठ्या प्रमाणात ग्लुकोज असते. ज्याचे शरीराला खूप तोटे होऊ शकतात. रोजच्या आहारात आपण साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. फक्त एक आठवडा साखर खाणे पूर्ण बंद केले तर शरीरात सकारात्मक बदल होऊ शकतात. शरीरातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण जिमला जातात. तसेच डायटींग , योगा करतात. मात्र हे सगळे करण्याऐवजी आता तुम्ही घरात बसूनही लठ्ठपणा कमी करू शकता. यासाठी केवळ तुम्हाला एक आठवड्यासाठी साखर सोडून द्यायची आहे. हे केल्याने तुमचे वाढलेले वजन ही कंट्रोलमध्ये येण्यास मदत होऊ शकते. तसेच रोज घेत असणाऱ्या आहारात गुळाचा आणि मधाचा जास्तीत जास्त वापर करावा. नियमीत साखर खाण्याची सवय असलेल्यांनी आहारात फळांचा समावेश करावा.
आठवडाभर साखर सोडल्याने शरीराला कोणते फायदे होऊ शकतात ?
जर तुम्हाला तुमचा चेहरा शेपमध्ये हवा असेल तर साखर पूर्णपणे बंद करा. याच तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. साखरेमुळे तुमच्या चेहऱ्याची सूज कमी होते. परिणामी तुमचा चेहरा सुंदर दिसू शकतो.
रोज गोड खाणाऱ्या लोकांनी काय करावे ?
तुम्हाला रोज गोड खाण्याची सवय असेल तर तुम्ही नॅचरल शुगरचा (Natural Sugar) वापर करावा. जसे कि , खजूर , फळे , गुळ , मध. याद्वारे तुम्ही शुगर क्रेविंग कमी करू शकता.
संपूर्ण दिवस राहू शकता एनर्जेटिक (Stay Energetic All Day)
साखर खाल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. साखर खाणे सोडले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत राहते. ज्यामुळे संपूर्ण दिवस तुम्ही एनर्जेटिक राहू शकतात.
ग्लोइंग त्वचा (Glowing Skin)
जास्त प्रमाणात साखर खाल्याने चेहऱ्यावर काळे डाग (Dark Spots) , पिगमेंटेशन (Pigmentation) यासारख्या समस्या निर्माण होतात. याकारणाने आजकाल बरेच लोक शुगर फ्री डाइट (Sugar Free Diet) खाणे पसंत करतात.
प्रतिकारशक्ती वाढते (Increases Immunity)
अति प्रमाणात साखर खाल्याने प्रतिकारशक्ती कमी होते. याव्यतिरीक्त जर साखर खाणे बंद केल्यास प्रतिकारशक्ती खूप वाढते आणि अनेक गंभीर आजार तुमच्यापासून दूर राहू शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )