Black Neck Home Remedy : मानेच्या काळेपणामुळे तुम्हाला लाज वाटते का? या पाच प्रभावी घरगुती 'पेस्ट' लावा, समस्या क्षणात दूर होईल
रोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये मानेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मान काळी पडू शकते.
Black Neck Home Remedy : सुंदर आणि निरोगी त्वचा सर्वांना हवी असते. चेहऱ्याच्या सुंदरतेमध्ये बाकी भागांकडे आपण दुर्लक्ष करतो. प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याची इच्छा असते, मग तो मुलगा असो वा मुलगी. बहुतेक लोक आपला चेहरा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी खूप मेहनत करतात. पण ते अनेकदा आपली मान साफ करायला विसरतात किंवा कदाचित त्याकडे लक्ष देणे आवश्यक समजत नाही. प्रत्येकजण प्रथम चेहरा पाहतो, म्हणून तो चमकदार करणे खूप महत्वाचे आहे. मात्र, तुमच्या स्किन केअर (Skin Care) रुटीनमध्ये मानेकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. असे नाही की काळ्या गळ्यापासून मुक्त होण्याचा कोणताही मार्ग नाही. तुमच्या घरात अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने मानेवरील काळेपणा सहज दूर करता येतो. आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मानेचा काळेपणा दूर करू शकता. कोणते आहेत हे घरगुती पर्याय जाणून घेऊया.
मानेचा काळेपणा कसा दूर करावा
बटाट्याचा रस (Potato Juice)
बटाटा हा स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. याचा उपयोग पिगमेंटेशन कमी करण्यासाठी केला जातो. यासाठी तुम्हाला बटाटा खिसून घ्यायचा आहे. त्याचा रस काढून घ्यावा . यानंतर लिंबाचा रस त्यात मिसळून तो मानेला लावावा. 10-20 मिनीट हे मिश्रण मानेला लावून ठेवावे आणि गार पाण्याने धुवून टाकावे.
मध (Honey)
मध देखील मानेचा काळेपणा दूर करू शकते. यासाठी तुम्हाला मधामध्ये दोन चमचा लिंबाचा रस मिसळून ही पेस्ट मानेला लावावी. 20 मिनट हे मिश्रण मानेला लावून ठेवावे आणि पाण्याने धुवून टाकावे.
बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोडा शरीरावरील कितीही जुन्या काळेपणाला काढून टाकायला मदत करते. याकरीता तुम्हाला पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टला काळ्या पडलेल्या भागात लावावे. काही वेळ तसेच ठेवून ते धुवून टाकावे.
कच्ची पपई (Raw Papaya)
सर्वात पहिल्यांदा पपई मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. पाण्यात ते मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 10-20 मिनीट मानेवर ही पेस्ट लावून ठेवावी. गार पाण्याने ते धुवून घ्यावे.
लिंबाचा रस (Lemon Juice)
लिंबाचा रस काळ्या मानेसाठी उपयोगी पडतो. लिंबाचा रस एका वाटीत काढून घ्यावा. तो मानेवर लावावा. नंतर तो धुवून टाकावा.
इतर महत्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )