Shashikant Warise Death Case : पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणात पंढरीनाथ आंबेरकरवर खुनाचा गुन्हा, कोण आहे पंढरीनाथ आंबेरकर?
Ratnagiri News : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोण आहे पंढरीनाथ आंबेरकर हे जाणून घेऊया..
Ratnagiri News : रत्नागिरीतील (Ratnagiri) पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या मृत्यू प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पत्रकार शशिकांत वारीसे त्यांच्या गाडीला सोमवारी (6 फेब्रुवारी) पंढरीनाथ आंबेरकर याच्या कारने जोराची धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूरला मृत्यू झाला होता. दरम्यान पत्रकार वारिसे यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्याबाबत प्रसिद्ध केलेली बातमी आणि त्यांचा झालेला अपघात ही वेळ पाहता हा नक्की अपघात की घातपात? याची चर्चा सध्या कोकणात सुरु झाली आहे. कोण आहे पंढरीनाथ आंबेरकर हे जाणून घेऊया..
कोण आहे पंढरीनाथ आंबेरकर?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावचा रहिवासी. सुरुवातीच्या काळात छोटासा आंबा व्यापारी असलेला पंढरीनाथ आंबेरकर 2017 सालानंतर मात्र आर्थिकदृष्टीने सक्षम झाला. कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली आणि त्यानंतर त्याने काही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. स्वतः देखील काही जमिनी खरेदी केल्या. यामध्ये त्याला आर्थिक नफा चांगलाच झाला. दरम्यानच्या काळात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपला व्यवसाय सुरु केला आणि वाढवला. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आताची घोषणा बारसू आणि सोलगाव येथे झाली. या ठिकाणी देखील आंबेरकर याने जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. तसेच स्वतःसाठी देखील काही जमिनी खरेदी केल्या. याबाबतच्या अनेक गोष्टी आपणाला राजापूर परिसरामध्ये ऐकायला मिळतात.
कोणते गुन्हे दाखल?
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात एका सभेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आंबेरकर आणि काही जणांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी राजापूर कोर्टाच्या आवारामध्ये नरेंद्र जोशी या रिफायनरी विरोधकांच्या नेत्यावर हल्ला केला. याप्रकरणी त्याच्या विरोधात राजापूर पोलीस स्टेशन येथे कलम 143, 146, 147, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
तर राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस स्टेशन येथे अश्विनी अशोक वालम शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी 14 जानेवारी 2018 रोजी कलम 143, 147, 149, 323, 504 आणि कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी वालम या कोकण रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या पत्नी आहेत. त्यांच्यासह काही महिला एकत्र आल्या होत्या. त्यावेळीही शिवीगाळ करण्यात आले आणि अशोक वालाम यांना मारण्याची धमकी ददेण्यात आली, असा उल्लेख या FIR मध्ये करण्यात आला आहे.
संंबंधित बातमी