Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं. वैशाख शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. सुख-सौभाग्याच्या प्राप्तीसाठी मोहिनी एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं.या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते.
Mohini Ekadashi 2024 : एकादशी तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथीचा दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. एकादशी तिथीला भगवान विष्णूंची पूजा करणं खूप शुभ समजलं जातं.
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचं (Mohini Ekadashi 2024) व्रत केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता, म्हणूनच या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. याच मोहिनी एकादशी व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊया.
कधी आहे मोहिनी एकादशी? (When Is Mohini Ekadashi 2024?)
या मोहिनी एकादशीचा उपवास आज, म्हणजेच 19 मे रोजी ठेवला जाईल. पंचांगानुसार, मोहिनी एकादशी 18 मे रोजी सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 19 मे रोजी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार, 19 मे रोजी मोहिनी एकादशीचं व्रत ठेवलं जाईल.
मोहिनी एकादशी पूजा विधी (Mohini Ekadashi Puja Vidhi)
जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा.
सकाळी लवकर अंघोळ करुन चांगले कपडे परिधान करा.
सकाळी तुळशीला जल अर्पण करा.
यानंतर भगवान विष्णूंची आराधना करा.
शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवा.
भगवान विष्णूंसमोर दिवा लावा, धूप लावा.
तुळशीचं पान आणि पंचामृत अर्पण करा.
विष्णू मंत्राचा जप करा.
भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करा.
देवाला फळ, फूल वाहा आणि अगरबत्ती लावा.
विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करा.
देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवा, त्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा.
मोहिनी एकादशीचे महत्व (Mohini Ekadashi Signifcance)
शास्त्रात मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रुप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो, असं म्हणतात. एवढंच नाही तर, एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख-शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन, ऐश्वर्य आणि बुद्धी प्राप्त होते. एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी कोणाचाही राग करू नये. एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दु:खं दूर होतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Numerology : लाखात एक असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; माहेरच नाही, तर सासरही गाजवतात