एक्स्प्लोर

Ratnagiri Rain : रायगड जिल्ह्यात NDRF च्या दोन तुकड्या दाखल, जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी साधला जवानांशी संवाद

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत.

Ratnagiri Rain : सध्या राज्याच्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नद्यांची पाणी चांगलीच वाढली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस झाला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोराचा पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या तुकडीचे प्रमुख बी. महेशकुमार यांच्यासह त्यांच्या सहकारी जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. 

सध्या रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी NDRF च्या जवानांशी संवाद साधला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, तहसिलदार श्री.सुरेश काशीद, महाड नगरपालिका मुख्याधिकारी महादेव रोडगे उपस्थित होते.

NDRF च्या या दोन तुकडीत प्रत्येकी 25 असे मिळून एकूण 50 जवानांचा समावेश आहे. निरीक्षक बी. महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील ही पथके महाड उपविभागात काम करतील. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफचे जवान आणि जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदतकार्य उत्तम प्रकारे करतील, त्यामुळं रायगडकरांनी विशेषतः महाडकरांनी घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, एनडीआरएफ पथकाचे निरीक्षक बी महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड  तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.  रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 1 हजार 716 रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sunetra Pawar VS Supriya Sule : लढाई बारामतीची, कसरत नात्याची! बारामती कोण जिंकणार? Special ReportABP Majha Headlines : 10 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Loksabha Election: वादग्रस्त भाषा, राजकारणाची दशा, राजकीय नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यZero Hour ABP Majha : गावागावातील मुलींना ड्रोन पायलट करणार, Narendra Modi यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Embed widget