मोठी बातमी ! रायगडमध्ये पहिल्या फेरीत सुनिल तटकरे आघाडीवर, अनंत गीते पिछाडीवर
रायगड लोकसभा मतदारसंघाचे सुरुवातीचे पहिल्या फेरीतील कल हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.
Raigad Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे सुरुवातीचे काही (Lok Sabha Election Result 2024) कल हाती येत आहेत. यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचे सुरुवातीचे पहिल्या फेरीतील कल हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते (Anant Gite) हे पिछाडीवर आहेत. दरम्यान, तटकरे यांची ही आघाडी कायम राहणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे 2024 रोजी मतदान झालं होतं. एकूण 2 हजार 185 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये एकूण 58 टक्के एवढे मतदान झालं होतं. अत्यंत तुल्यबळ ही लढत मानली जात आहे. कारण, 2019 साली देखील याच दोन उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती. यावेली देखील याच दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. दिग्गज नेत्यांची या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.