रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यातील मतदारसंघ आणि आमदारांची यादी-
पनवेल विधानसभा- प्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जत विधानसभा- महेंद्र थोरवे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
उरण विधानसभा- महेश बालदी (अपक्ष)
पेण विधानसभा- रवीशेठ पाटील (भाजप)
अलिबाग विधानसभा- महेंद्र दळवी (शिवसेना - एकनाथ शिंदे)
श्रीवर्धन विधानसभा- अदिती तटकरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
महाड विधानसभा- भरत गोगावले (शिवसेना - एकनाथ शिंदे)
रायगड जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व-
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन गिते यांना पराभवाचा सामना करावा लागला. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 3, भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले होते. सध्याचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असल्याचे दिसून येतंय. कारण शिवसेनेचे तीनही आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. तर अदिती तटकरे देखील महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार गटासोबत आहेत.
विधानसभानिहाय 2019 मधील लढती आणि मताधिक्य-
पनवेल विधानसभा-
पनवेल विधानसभा मतदारसंघ हा मावळ लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे प्रशांत ठाकूर 1,79,109 मते मिळवून विजयी झाले.भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष पक्षाचे हरेष मनोहर केनी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
कर्जत विधानसभा-
2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. कर्जत हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशभाऊ नारायण लाड यांचा 18046 मतांनी पराभव करून विजय मिळवला.
उरण विधानसभा-
2019 मध्ये हा मतदारसंघ अपक्ष उमेदवाराने जिंकला होता.उरण हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेचे मनोहर गजानन भोईर यांचा 5710 मतांनी पराभव करून विजय मिळवला.
पेण विधानसभा-
2019 मध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता.पेण महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये, भारतीय जनता पक्षाचे रवीशेठ पाटील यांनी 24051 मतांच्या फरकाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे धैर्यशील मोहन पाटील यांचा पराभव करून जागा जिंकली.
अलिबाग विधानसभा-
2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. अलिबाग हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाच्या सुभाष पाटील यांचा 32924 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली.
श्रीवर्धन विधानसभा-
2019 मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला होता. श्रीवर्धन महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद रामचंद्र घोसाळकर यांचा 39621 मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला.
महाड विधानसभा-
2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. महाड हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेनेचे गोगावले भरत मारुती यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माणिक मोतीराम जगताप यांचा 21575 मतांनी पराभव करून जागा जिंकली.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने पनवेल सर्वात मोठे शहर-
खारघर, उलवे नोड, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे आणि कळंबोली नोड्स तसेच उरण शहर आणि त्याचे बंदर, जेएनपीटी यांचा समावेश असलेल्या नवी मुंबईच्या नियोजित महानगरात जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग समाविष्ट आहे. रायगड जिल्ह्यात खारघर, तळोजा, कळंबोली, पनवेल, रसायनी, कर्जत, खोपोली, माथेरान, उरण, पेण, अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, नागोठणे, सुधागड-पाली, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, बिरवाडी या शहरांचा समावेश होतो. पोलादपूर. लोकसंख्या, औद्योगिकीकरण तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर पनवेल आहे.