एक्स्प्लोर
Advertisement
10 रुपयांच्या वादातून पुण्यात महिलेनं स्वत:ला पेटवलं
पुणे : पुण्यातील चतुश्रुंगी परिसरात जनवाडीमध्ये दहा रुपयांवरुन झालेल्या वादातून एका महिलेनं स्वत:ला जाळून घेतलं आहे. दहा रुपयांवरुन शेजाऱ्यांशी महिलेचा वाद झाला होता. या वादात महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर महिलेनं स्वत:ला जाळून घेतलं, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
चतुश्रुंगी परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय सुदरम्मा शेलार या महिलेनं आपल्या लहान मुलाला 10 रुपये दिले होते. मात्र शेजारच्या मुलीनं पैसे हातातून हिसकावून घेतले. त्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेचं शेजाऱ्यांशी भांडण झालं. या भांडणावेळी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर महिलेनं स्वत:च्या राहत्या घरात डिझेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. यात महिलेचा जळून मृत्यू झाला आहे.
महिलेनं जाळून घेतल्यानंतर तीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी भारती गायकवाड आणि हरीष गायकवाड यांच्याविरोधात चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 12 वर्षीय पुजा गायकवाडला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भविष्य
आरोग्य
Advertisement