एक्स्प्लोर

Walmik Karad surrender: अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!

Walmik karad in Pune: वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्या. गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड हे फरार होते.

पुणे: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार असा ठपका असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्याठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जमले होते. यानंतर एमएच 23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या स्कॉर्पिओ कारमधून वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत दोन व्यक्ती होत्या. यापैकी एका व्यक्तीने वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कार्यालयात येण्यापूर्वी कुठे होते, याचा ठावठिकाणा सांगितला.

वाल्मिक कराड यांच्यासोबत गाडीतून उतरलेल्या या दोघांना प्रसारमाध्यमांनी घेरले. तुम्ही वाल्मिक कराडांसोबत कुठून आलात, कुठे होतात, असा प्रश्न यापैकी एका व्यक्तीला विचारण्यात आला. यावर संबंधित व्यक्तीने म्हटले की, आम्ही आता देवावरुन आलो, आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इकडे आलो. पण आठ दिवस वाल्मिक कराड कुठे होते, माहिती नाही. वाल्मिक कराड मला अक्ककोटच्या मंदिरात भेटले, असे या व्यक्तीने सांगितले. तर या व्यक्तीसोबत असणारा बीडमधील एक नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून वाल्मिक कराड यांच्यासोबत आहे. परवापासून वाल्मिक कराड हे पुण्यातच आहेत, असे या नगरसेवकाने सांगितले. वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भीती वाटत होती, असे या नगरसेवकाने सांगितले.

वाल्मिक कराड हे मंगळवारी दुपारी 12 वाजता सीआयडीच्या कार्यालयात आले. तत्पूर्वी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली. मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. सरपंच संतोष भैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी आहे, त्यांना अटक करावी. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. केवळ राजकीय द्वेषापोटी या प्रकरणाशी माझे नाव जोडले जात आहे. पोलीस निष्कर्षात मी जर दोषी आढळल्यास न्यायदेवता जे काही शिक्षा देईल ते मी भोगण्यास तयार आहे, असे वाल्मिक कराड यांनी म्हटले.

सध्या पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड यांची चौकशी सुरु आहे. सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून वाल्मिक कराड यांना प्रश्न विचारले जात आहेत. या चौकशीत कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?

23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 22 March 2025: ABP MajhaSomnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनीच मारलं? गुन्हा दाखल करा Special ReportPankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
Embed widget