एक्स्प्लोर

Pune Vista Dome News: निसर्गाची किमया अनुभवत प्रवास करा... पुणे रेल्वे विभागातील चार गाड्यांमध्ये विस्टाडोम कोच

25 जुलैपासून प्रगती एक्स्प्रेस आणि 10 ऑगस्टपासून शताब्दी एक्स्प्रेस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. पुणे-मुंबई मार्गावरील विस्टाडोम कोचमधून प्रवास करताना, प्रवासी नदी, धबधबे याचा आनंद घेता येतो

Pune Vista Dome News: पुणे रेल्वे विभाग सध्या डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या व्हिस्टाडोम डब्यांसह धावत आहे, ज्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस सुरू केली आहे. 25 जुलैपासून प्रगती एक्स्प्रेस आणि 10 ऑगस्टपासून शताब्दी एक्स्प्रेस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. पुणे-मुंबई मार्गावरील विस्टाडोम कोचमधून प्रवास करताना, प्रवासी नदी, दरी, धबधबे या दृश्यांचा आनंद घेतात. ज्यात माथेरान टेकडी, सोनगीर टेकडी, उल्हास नदी, खंडाळ्यातील घाट भागांचा समावेश आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वरील विहंगम दृष्य टिकण्यासाठी हा विस्टा डोम बसवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना निसर्ग सौंदर्य अनुभवता आलं.

पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्येही प्रवास करताना आता प्रवासी निसर्गरम्य, विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. व्हिस्टाडोम कोचच्या विशेष आकर्षणांमध्ये रुंद खिडकीचे फलक आणि काचेचे छप्पर, फिरता येण्याजोग्या जागा आणि पुशबॅक खुर्च्या  आहेत. विस्टाडोम कोच हा भारतीय रेल्वेचा एक नवीन उपक्रम आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासही संस्मरणीय होतो. त्याचबरोबर पर्यटनालाही चालना मिळते. ज्या ट्रेनमध्ये हा डबा बसवला जात आहे त्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी एकूण 44 जागा आहेत. या आसने तर आरामदायी तर आहेतच शिवाय पाय मोकळी भरपूर जागा आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लोकही आरामात प्रवास करू शकतात. फिरत्या खुर्च्या देखील आहे. 

कसा आहे विस्टा डोम-
या विस्टाडोम कोचला तिन्ही बाजूंनी काचेच्या खिडक्या आहेत, हा कोच पूर्णपणे पारदर्शक आहे. जनशताब्दीच्या मागच्या बाजूला हा डबा बसवण्यात येणार आहे, जेणेकरून ट्रेन स्टेशनवरून निघून गेल्यावर लोक केवळ आतून दृश्ये पाहू शकत नाहीत तर त्यांची नोंदही करू शकतात. विस्टाडोम कोचचे छतही काचेचे आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान पर्वत आणि दऱ्यांमधून जाणारे सुंदर ढग, आकाशातील तारे आणि चंद्राची मंत्रमुग्ध करणारी दृश्ये लोकांना आवडतील. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget