एक्स्प्लोर
जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'
पुणे : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातल्या वारजे गावात झालेल्या स्पर्धेत विजय चौधरीनं अभिजित कटकेवर मात करुन सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याचा मान मिळवला.
या विजयासहच विजय चौधरीनं नरसिंग यादवच्या सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या विक्रमाशीही बरोबरी साधली.
विजय चौधरीनं माती विभागातून महाराष्ट्र केसरीची फायनल गाठली होती. तर अभिजित कटकेनं मॅट विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या लढाईत विजय चौधरीनं अभिजित कटेकला धूळ चारली मानाची गदा पुन्हा उचलण्याचा मान मिळवला.
'महाराष्ट्र केसरी' विजय चौधरीबद्दल माहिती :
- विजय चौधरी 2014 आणि 2015 साली सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी किताबासाठी खेळण्याचा आणि तो जिंकण्याचाही अनुभव होता. यावेळीही त्या अनुभवाच्या आधारे खेळत सलग तिसऱ्यांदा विजयने 'महाराष्ट्र केसरी'चा किताब आपल्या नावावर केला.
- वय - 28 वर्षे
- उंची - 6 फूट 2 इंच
- वजन - 118 किलो
- धूमछडी आखाडा आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र
- प्रशिक्षक - रोहित पटेल, ज्ञानेश्वर मांगडे आणि अमोल बुचडे
- मुख्य वैशिष्ट्यं - संयम, बचाव आणि प्रतिहल्ला ही खेळाची वैशिष्ट्यं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement