केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा #MeToo मोहिमेला पाठिंबा
ज्या मंडळींवर सध्या आरोप होत आहेत, ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली.
![केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा #MeToo मोहिमेला पाठिंबा union minister ramdas athvale support to metoo Campaign केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा #MeToo मोहिमेला पाठिंबा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/14230628/ramdas-athavle.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : मी टू मोहिमेद्वारे ज्यांच्यावर आरोप झाले, ते सिद्ध झाल्यास त्या सगळ्यांवर कारवाई व्हावी, मग तो अभिनेता असो किंवा नेता, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मी टू मोहिला पाठिंबा दिला. तसेच मी टू मोहीम ही निराधार आरोप करण्याचं व्यासपीठ बनू नये. त्याचा वापर कुणाला फसवण्यासाठी होऊ नये, असंही आठवले म्हणाले.
जर एखादी व्यक्ती महिलेचा अपमान करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ज्या मंडळींवर सध्या आरोप होत आहेत, ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली.
मीटू या मोहिमेद्वारे अनेक बड्या व्यक्तींना फसवण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी आरोपांची सत्यता पडताळली पाहिजे. अनेक वर्षांनंतर आरोप होत आहेत असं बोललं जात आहे, मात्र संबंधीत व्यक्ती दोषी असल्यास योग्य तपास केला तर पुरावे नक्की मिळतील, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.
#MeToo चं वादळ
#MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून सिनेदिग्दर्शक साजिद खान, विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)