TMV Pune : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला ISO मानांकन प्रदान; 'आयएसओ' मानांकन मिळविणारं देशातील पहिलं विद्यापीठ
पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आला आहे. आयएसओचे अधिकारी महेश मालपाठक यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला हे मानांकन प्रदान केलं आहे.
TMV Pune : पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला (TMV) आयएसओ मानांकन ( ISO accreditation) प्रदान करण्यात आला आहे. आयएसओचे अधिकारी महेश मालपाठक यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला हे मानांकन प्रदान केल्याचं जाहीर केलं. गुणवत्तापूर्ण शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी हे विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. शिक्षणपद्धती आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी 'टिमवि'ला ‘आय.एस.ओ. 21001ः 2018’ मानांकन जाहीर करण्यात आलं होतं.
लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा चालविण्याचे कार्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अविरत करत आहे. विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. आयएसओ मानांकन मिळवणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरल्यामुळे हे विद्यापीठ शैक्षणिक संस्थांसमोर आदर्श ठरले आहे. हा केवळ टिमविचा गौरव नसून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा गौरव आहे. या गौरवामुळे शिक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या गरजेनुसार शिक्षण देण्यात हे विद्यापीठ आग्रेसर आहे. काळाची पावले ओळखून अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धतीत बदल केल्यामुळे या विद्यापीठाची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना हे मानांकन मिळालं आहे.
या कार्यक्रमाला राधाकृष्ण उपस्थित होते. परदेशातील नामांकित विद्यापीठाचे कॅम्पस आपल्याकडे येत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात जगाच्या तुलनेत आपले स्थान समजण्यास त्यामुळे मदत होणार आहे. लोकमान्य टिळक हे देशाचे स्फूर्तिस्थान आहेत. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या विद्यापीठाला जयंतराव टिळक यांचा वारसा लाभला असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. तोच वारसा डॉ. दीपक टिळक पुढे चालवत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे 'आयएसओ' मानांकन मिळविणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण व रोजगाराभिमुख शिक्षण पद्धती विद्यापीठाने राबविली. विद्यापीठातील गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक शिक्षणामुळे विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. विद्यापीठातील विविध विभागांनी कायमच शैक्षणिक दर्जाची उंची टिकवून ठेवली. हे आयएसओ नामांकन मिळण्यात विद्यापीठाच्या सर्व घटकांचा महत्वाचा सहभाग आहे, असं प्र. कुलगुरू डॉ. गिताली टिळक यांनी म्हटलं आहे. यापुढेही विद्यापीठात अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येतील. काळानुसार आणि शिक्षणपद्धतीनुसार अभ्यासक्रमात आणि महाविद्यालयील वातावरणात बदल करण्याकडे आमचं लक्ष असेल, असंही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्र. कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती टिळक, प्र-कुलसचिव अभिजीत जोशी, सचिव अजित खाडीलकर, 'आयएसओ'चे पुणे विभागाचे प्रमुख अनिल कदम उपस्थित होते.