एक्स्प्लोर

Pune Crime: विकृतीचा कळस! पित्यानेच केली पोटच्या पोराची हत्या

परी चिंचवड शहरातील मोशी संकुलात पित्याने आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. कौटुंबीक वादातून आज सकाळी सहा वाजता युवराज अशोक सावळे यांची हत्या करण्यात आली

Pune Crime: पिंपरी चिंचवड शहरातील मोशी संकुलात पित्याने आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. कौटुंबीक वादातून आज सकाळी सहा वाजता युवराज अशोक सावळे यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर वडिलांनी स्वतः पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

युवराज सावळे हे आई-वडील आणि मोठ्या भावासोबत मोशी संकुलात राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून युवराज लहान-लहान गोष्टीवरून आई-वडील आणि भावाशी भांडत असे. रात्री उशिरा युवराज आणि कुटुंबात पुन्हा भांडण झाले, त्यानंतर आई आणि मुलाला घरातून हाकलून देण्यात आले आणि वडील आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की वडिलांनी युवराजच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून त्याचा खून केला, अशी प्राथमिक माहिती आहे. हत्येनंतर वडिलांनीच भोसरी एमआयडीसी पोलिसांना घाटनेची माहिती दिली आणि आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस पथक पुढील तपास करत आहेत, अशी प्राथमिक माहिती पोलीस

दोन घटनांनी पिंपरी-चिंचवड हादरलं

यापुर्वी आईसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे मुलाने संबंधित व्यक्तीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे घडली होती. मृताचे आईसोबत अनैतिक संबंध असल्याने मुलगा संतापला होता. त्यातून मुलाने हत्येचा कट रचला. निर्जन ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलाने त्याची हत्या केली होती. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. दीपक वाघमारे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहे. मात्र खून आणि चोरीच्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिसरात अनेकदा भीतीचं वातावरण असतं. आतापर्यंत दोनवेळा मुलाने आईची हत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या दोन्ही घटना ताज्या असतानाच या नव्या घटनेने पिंपरी-चिंचवड हादरलं आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 
कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
Embed widget